esakal | मोटारसायकल कार अपघातात पती- पत्नीचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारसायकल कार अपघातात पती- पत्नीचा मृत्यू 

मोटारसायकल कार अपघातात पती- पत्नीचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर ः अमळनेर- धुळे रस्त्यावर असणाऱ्या मंगरूळ गावाजवळ दुपारी दीडच्या सुमारास मोटारसायकल व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले तर एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दोघ मयतांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी बालकास धुळे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
मोटारसायकल व कारच्या अपघातात अनिल पितांबर वाघ (वय 32, रा. जानवे, ता. अमळनेर) हे पत्नी सोनाली (वय 28) व मुलगा प्रियांश (वय 7) यांच्यासह मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19, 2111) ने जात होते. पत्नी सात महिन्यांची गर्भवती असल्याने उपचारासाठी अमळनेर येथे रुग्णालयात जात असतांना धुळे रस्त्यावरील लोंढवे ते मंगरूळ दरम्यान कारने (क्रमांक एमएच, 18 बीसी 2117) समोरून जोरदार धडक दिली. यात अनिल व सोनाली वाघ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियांश हा गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. 

loading image
go to top