Video माती खचताच मानेपर्यंत दबला...अडीच तास चालले प्रयत्न 

उमेश काटे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अमळनेर शहरातील हरिओमनगर परिसरात भुयारी गटारीचे काम सुरू असून, तेथे पाईप जोडणीचे काम करण्यासाठी कामगार खाली उतरले होते. यावेळी अरुण इंगळे (औरंगाबाद) यांच्यासह एक जण पाईप जोडणीचे काम करीत होते. त्याचवेळी अचानक मातीचा भाग अंगावर कोसळल्याने ते दाबले गेले

अमळनेर ः शहरातील हरिओमनगर भागात भुयारी गटारीचे काम सुरु आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास खोल असलेल्या चेंबरमध्ये पाईप जोडणीचे काम करत असताना अचानक माती खचून कामगार मानेपर्यंत दबला गेला. हालचालही करता येईना; पण दोन- अडीच तासाच्या प्रयत्नानंतर त्या कामगारास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. 

अमळनेर शहरातील हरिओमनगर परिसरात भुयारी गटारीचे काम सुरू असून, तेथे पाईप जोडणीचे काम करण्यासाठी कामगार खाली उतरले होते. यावेळी अरुण इंगळे (औरंगाबाद) यांच्यासह एक जण पाईप जोडणीचे काम करीत होते. त्याचवेळी अचानक मातीचा भाग अंगावर कोसळल्याने ते दाबले गेले. त्याच्यातील एक जण सुखरुप बाहेर पडला. मात्र, सुमारे पंधरा फुट खोल असलेल्या भागात अरुण इंगळे हे मानेपर्यंत दाबले गेले. 

दोन तास मदतकार्य 
मातीखाली दबलेल्या अरूण इंगळे यांच्या बचावासाठी प्रसादनगर, श्रध्दानगर, हरिओमनगर भागातील नागरिक धावून आले. जवळच असलेल्या ठेकेदाराच्या पोकलॅण्डसह शेख रफिक शेख हमीद, सोयब खान युसूफ खान, बबलू राजेंद्र पाटील यांनी टिक्कम, पावडीच्या साहाय्याने मदत कार्याला सुरवात केली. सुमारे दीड ते दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या व्यक्‍तीला सुखरुप बाहेर काढण्यात आले. पुढील उपचारासाठी त्या व्यक्‍तीला खासगी वाहनाने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner ander ground drenage work man soild

टॅग्स
टॉपिकस