कोरोनाचा पहिला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

दाम्पत्य 15 मार्चला अमळनेर ला आले होते. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी दक्षता म्हणून कोरोना तपासणी करण्याबाबतचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र त्यांनी ही माहिती लपवून ठेवली.

अमळनेर- येथील एक दाम्पत्य हे थायलंड व बँकॉक येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र ही बाब लपवत होते. कोरोना बाबत तपासणी करणाऱ्या पथकपासून खरी माहिती लपविली व शासनाची दिशाभूल केली म्हणून त्याच्या विरुध्द गुन्हा करण्यात आला आहे. हा गुन्हा राज्यातील  पहिला गुन्हा असावा.
या दाम्पत्याला सद्यस्थितीत 15 दिवसासाठी स्वयंम विलीनीकरण करण्यात आले आहे.  सद्यस्थितीत त्याना कोरोनाची लक्षणे नसली तरी त्यावर आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे.

हेपण पहा - महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने घेतला निर्णय...सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद 

हे  दाम्पत्य 15 मार्चला अमळनेर ला आले होते. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी दक्षता म्हणून कोरोना तपासणी करण्याबाबतचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र त्यांनी ही माहिती लपवून ठेवली. कोरोना व्हायरस वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पथक हे दोन ते तीन वेळा त्यांच्याकडे गेले असता त्यांनी पुणे येथे गेलो असल्याचे सांगितले होते. मात्र पथकासमवेत पोलीस शरद पाटील गेल्यावर खरी माहितीसाठी पोलिस खाकी दाखवताच आम्ही थायलंड व बँकॉक येथे फिरण्यासाठी गेलो असल्याचे कबूल केले. शासनाची दिशाभूल केली म्हणून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या निर्देशानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांनी त्या दाम्पत्याविरुद्ध साथ रोग अधिनियमन 1897 च्या अंमलबजावणीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने 2 (अ) व 3 भदवि कलम 188 प्रमाणे कायदेशीर फिर्याद देऊन येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्सटेबल बापू साळुंखे पुढील तपास करीत आहेत. हा गुन्हा महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल झाला असावा. दरम्यान आतापर्यंत शहरात दोन दाम्पत्य व एक तरुण असे 5 जण परदेशात गेले होते. त्यांना सद्यस्थितीत प्रतिबंधक उपाय म्हणून 15 दिवसासाठी स्वयंम विलीनीकरण करण्यात आले आहे.  सद्यस्थितीत त्याना कोरोनाची लक्षणे नसली तरी त्यावर आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner corona virus first police case state