esakal | कृपा करून पाच दिवस कुणीही बाहेर निघू नका : आमदार अनिल पाटील

बोलून बातमी शोधा

anil patil

कोरोनाला हरवण्यासाठी जमतेने घरातच राहावे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आदी रुग्णासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.

कृपा करून पाच दिवस कुणीही बाहेर निघू नका : आमदार अनिल पाटील
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. 46 रुग्ण पॉसिटीव्ह असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी आजपासून पाच दिवस कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी जनतेला केले आहे.

नक्‍की पहा - एक वर्षाचा चिमुरडा...मृत्यूच्या दारेतून "कोरोना' फायटरने वाचविले...


आमदार पाटील यांनी ऑडिओ क्लीप द्वारेही जनतेला आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले, की कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. गाव पातळीवर पोलिसपाटील, सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, पोलिस अधिकारी, कर्मचारी, शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवक आदींनी आपापल्या परिसरातील जनतेला घरीच राहण्याचे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करावे. कोरोनाला हरवण्यासाठी जमतेने घरातच राहावे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आदी रुग्णासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी. पाच दिवस घरातच राहून जनता कर्फ्यु यशस्वी करावा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

अमळनेर पूर्ण लॉकडाऊन
गुरुवारी (ता. 6) रात्री 18 जणांचे अहवाल कोरोना पॉसिटीव्ह आले. या घटनेने तालुका हादरला आहे. आज सकाळी आमदार अनिल पाटील व अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन कडक उपपययोजना राबिण्याचे नियोजन केले. शहरातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. किराणा दुकाने, दूध व्यवसाय, भाजीपाला आदी सर्व पूर्णपणे बंद आहेत. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनीही यास आज प्रतिसाद दिला आहे. अत्यावशक्य असेल तरच वैद्यकीय सेवा व मेडिकल उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

बोरसे गल्लीतील संशयित निगेटीव्ह
बोरसे गल्लीतील एक जण कोरोना पॉसिटीव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबासह काही जणांना जळगाव येथे तपासणीसाठी नेले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ते आज घरी परतले. त्यांचे गल्लीतील नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.