एक वर्षाचा चिमुरडा...मृत्यूच्या दारेतून "कोरोना' फायटरने वाचविले त्याचे प्राण ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 May 2020

आपने जो सेवा दी...उसके वजह से आज हम घर पर जा रहे. आप की वजह से आज का दिन देखनो को मिला

धुळे: धुळे शहरात कोरोना बांधितांची संख्या दिवस दिवस वाढत आहे. त्यामूळे चिंताजणक परिस्थिती असून भयानक परिस्थितीत बुधवारी सायंकाळी सात रुग्ण घरी परतले. त्यात अकरा वर्षाच्या मुलगी सोबत एक वर्षाचा चिमुरड्याचा देखील समावेश असून कोरोना फायटरांना त्याला मृत्यूच्या दारेतून खेचून आणण्यात त्यांना यश मिळाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. 

आर्वजून पहा : ब्युटी इंडस्ट्रिसाठी 17 मेनंतर योजना राबवू :  मंत्री नितीन गडकरी 
 

कोरोना विषाणूवर मात करुन धुळे जिल्ह्यातील आणखी सात रुग्ण बुधवारी घरी गेले. यात एका वर्षाच्या बाळासह 11 वर्षाची मुलगी, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोना आजारातून बरे होवून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. 

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 32 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात, तर उर्वरित 18 रुग्णांवर कोविड केअर सेंटरमधील सर्वसाधारण वॉर्डात उपचार सुरू आहेत. 

क्‍लिक कराः अधिकाऱ्यांचा मनधरणीसाठी वाईन शॉपि मालकाने ठेवली पार्टीचे 
 

अहवाल आले निगेटिव्ह 
उपचारासाठी दाखल सात रुग्णांना 14 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची घेण्यात आलेली चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे या सात जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते. 

नक्की वाचा :मालेगावात बंदोबस्ताला गैरहजर; आणखी दोघे पोलिस निलंबित
 

आप की वजह से, घर जा रहे है ! 
रुग्णालयातून घरी जात असतांना आपने जो सेवा दी...उसके वजह से आज हम घर पर जा रहे. आप की वजह से आज का दिन देखनो को मिला अशा शब्दात कोरोना विषाणूच्या आजारातून बऱ्या झालेल्या महिलेने आपल्या भावना व्यक्त करून सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्यांचा गौरवोद्गार काढले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule One year old baby corona free by corona fightar