esakal | विद्यार्थ्यांची भाजी विक्रीतून सहा हजार रुपयांची उलाढाल 
sakal

बोलून बातमी शोधा

student market

विद्यार्थ्यांची भाजी विक्रीतून सहा हजार रुपयांची उलाढाल 

sakal_logo
By
श्‍यामकांत पाटील

गोवर्धन (ता. अमळनेर) : विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे. नफा- तोटा याचाही प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मारवड (ता. अमळनेर) येथील मुला- मुलींच्या शाळेत बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांचा बाजार भरविण्यात आला. यात सुमारे सहा हजार रुपयांची उलाढाल झाली. या मेळाव्यात विविध दात्यांकडून सुमारे ८० हजार रुपयांची देणगीही शाळेच्या विकासासाठी देण्यात आली. 
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, हिरवा भाजीपाला, खेळणी, कटलरी वस्तू, गृहोपयोगी वस्तू आदींचे स्टॉल मेन बाजार चौकात लावले. सरपंच उमेश साळुंखे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. या मेळाव्यास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. मेळाव्यातच विद्यार्थ्यांनी हागणदारीमुक्‍त गाव होण्यासाठी पथनाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले होते. दिनेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. तुषार देवरे यांनी आभार मानले. उपसरपंच बी. डी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम साळुंखे, पंकज पाटील, उमेश चौधरी, एल. जे. चौधरी, गोकूळ पाटील, जितेंद्र पाटील, उमेश सुर्वे, उमाकांत साळुंखे, रूपेश साळुंखे, गजानन चौधरी, भटू पाटील, संजय पवार, मुख्याध्यापिका मनीषा निकम, उपशिक्षिका स्वाती पाटील, सारिक काटके, शारदा जाधव, वैशाली पाटील आदींनी सहकार्य केले. 

दात्यांनी केले सहकार्य 
शाळेने शैक्षणिक उपक्रमांतर्गत ७९ हजार ५०० रुपयांची लोकसहभाग मिळविला. नाशिक येथील रहिवासी डॉ. जानकी े व डॉ. नरसिंग माने या दांपत्याने स्टडी टेबलसाठी ५० हजार रुपयांची देणगी दिली. इंजिनिअर जयवंतराव साळुंखे यांनी शाळेला १५ हजार रुपयांचे ध्वनिक्षेपक यंत्रणा दिली. सुरत येथील उद्योजक अशोक इंदूरे यांनी ग्रीन बोर्डसाठी ५ हजार ५०० रुपये, जामनेर येथील ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी नमुना क्रमांक एक लॅमिनेशनसाठी पाच हजार रुपये, पंकज लोहार यांनी दोन हजार रुपये, ज्ञानेश्‍वर पवार यांनी एक हजार रुपये, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चौधरी एक हजार रुपये देणगी दिली. तसेच मारवड ग्रामपंचायतीने पाच अंगणवाड्यांना स्वयंपाकाची भांडी, तीन एलइडी संच, मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, सीसॉ बास्केटबॉल आदींचे वितरण केले. 
 

loading image