आपण ‘सीसीटीव्ही’च्या नियंत्रणातखाली; फक्त फलक लावून दिशाभूल

दीपक वाघ
Saturday, 28 November 2020

शिरपूर तालुक्यातील अनेर धरण हे संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्‍यात प्रचलित आहे. शिरपूर तालुक्याची ओळख प्रामुख्याने सातपुडा पर्वतरांगेतील अनेर या धरणावरुन होते.

बभळाज (धुळे) : अनेर (ता. शिरपूर) धरणावरील एका बंदिस्त मशीनरीच्या गृहावर हे धरण क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आहे. असा बोर्ड या गृहावरील भिंतीवर लावण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात पाहिले तर येथे कुठलाही सीसीटीव्ही कॅमेरा नसून लावलेले बोर्ड हे फक्त नावालाच उरले आहे. 

स्व. कर्मवीर व्यंकटरावजी तानाजी रंधे व स्वर्गीय दादासो शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांनी साकारलेले शिरपूर तालुक्यातील अनेर धरण हे संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्‍यात प्रचलित आहे. शिरपूर तालुक्याची ओळख प्रामुख्याने सातपुडा पर्वतरांगेतील अनेर या धरणावरुन होते. या धरणावर लोक पर्यटनस्थळ म्हणून भेट देण्यासाठी तसेच येथील प्रसिद्ध असलेल्या माशांची चव चाखण्यासाठी बरीच खवय्येगिर शौकीन मंडळी या ठिकाणी येतात. त्यादृष्टीने सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असणे खूपच गरजेचे असुन त्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. सीसीटीव्ही नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे .यामुळे ‘हे धरण क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली’ असा नुसता बोर्ड न लावता लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा बसवुन कार्यान्वित करावी अशी अपेक्षा धरणावर येणाऱ्या पर्यटकांनी व्यक्त केली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aner dam cctv camera only board