#Motivational:पर्यावरण संतुलन,जलप्रदूषण रोखण्यासाठी साकुरकर एकवटले....अस्थिविसर्जनाची प्रथा बंद,

residentional photo
residentional photo

अस्वली स्टेशन-:पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी गावातील मृत व्यक्तींच्या अग्निडागानंतर अस्थी व रक्षा नदीपात्र किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. त्यामध्ये केशर आंबा, फणस यासारखी फळझाडे त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ लावण्याचा संकल्प साकुर गावातील विष्णु पावशे यांच्या कुटुंबाने केला आहे. नुकताच गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली त्यात अनेक संतांनी अनमोल प्रबोधन कथन केले. ग्रामस्थ जे चांगलं आहे ते नक्कीच स्वीकारतात त्यातूनच पूर्वापार सुरु असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा बंद करण्याचा धाडशी मात्र अत्यंत स्तुत्य निर्णय घेण्यात आला त्यास ग्रामस्थांनी ही दुजोरा दिल्याने तालुक्यात  या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

  कै. तुळसाबाई विष्णू पावसे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे अस्थी आणि रक्षा विसर्जन कुठल्याही नदीत न करण्याचा दूरगामी निर्णय साकुरच्या पावसे परिवाराने घेतला. परंपरेच्या नावाखाली प्रदूषणात भर पाडणाऱ्या प्रथा बंद करण्याचा पावसे परिवाराचा निर्णय आमच्या सर्वांसाठी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे.

देशमुख महाराजांचे विचार कृतीत आणले

कै. तुळसाबाई विष्णू पावसे यांच्या निधनानंतर पती  विष्णू नारायण पावसे, मुलगा तथा गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब पावसे, दुसरा मुलगा तथा सोसायटीचे संचालक सुरेश विष्णू पावसे यांनी कै. तुळसाबाई यांचे अस्थीविसर्जन नदीत न करता स्वतःच्या जमिनीत करून सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे. साकुर गावाच्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख महाराजांनी केलेले उदबोधन त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन पावसे परिवाराने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे अभिमानास्पद काम केले आहे. 

सारे काही पर्यावरणासाठी

पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी गावातील मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा नदीपात्र किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. त्यामध्ये केशर आंबा, फणस यासारखी फळझाडे त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ लावण्यात यावीत, असे अखंड हरिनाम सप्ताहात नुकतेच प्रबोधन झाले होते.

पावसे कुटूंबियांचा पुढाकार

गावातील प्रतिष्ठित असणाऱ्या पावसे कुटुंबियांत कै. तुळसाबाई विष्णू पावसे यांचे नुकतेच निधन झाले. गावातील अस्थी विसर्जन बंद करण्यासाठी पावसे कुटुंबियांनी पुढाकार घेतला. त्यांनी मातोश्री तुळसाबाई यांच्या अस्थी स्वतःच्या शेतात विसर्जित करून अखंड सुरू असलेल्या परंपरेला फाटा दिला. शेतात फुललेल्या पिकांमधून आणि झाडांमधून आपल्या जिवलग व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना पावसे कुटुंबियांनी व्यक्त केली.

 समस्थ साकुर गावकऱ्यांना पावसे परिवाराचे विष्णू नारायण पावसे, बाळासाहेब विष्णू पावसे, सुरेश विष्णू पावसे ह्या सर्वांचा हृदयातून अभिमान वाटतो. त्यानुसार ग्रामपंचायतीमार्फत दिवंगतांच्या स्मरणार्थ त्यांच्या शेतात झाडे लावण्यात येतील. यापुढे गावातील कोणत्याही अंत्यविधीनंतर त्यांच्या शेतात ग्रामपंचायतीकडून झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आम्ही हा निर्णय अंमलात आणला आहे.
-तुकाराम सहाणे, ग्रामपंचायत सदस्य,साकुर.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com