....तर शिवसेना सरकार वाचविण्यासाठी भाजप पुढे येईल.....अशिष शेलार यांचे सूतोवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

नाशिक- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कॉंग्रेसने पुकारलेले भारत बचाव आंदोलन हे प्रत्यक्षात पाकिस्तान- बांग्लादेश बचाव आंदोलन असल्याची टिका भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी करताना नागरिकत्व दुरुस्ती विधेयक महाराष्ट्रात लागु केल्यास राष्ट्रहिताच्या दृष्टीने शिवसेनेला मदत करण्यासाठी भाजप राजकीय तडजोड करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये श्री. शेलार बोलत होते. ते म्हणाले, नागरिकत्वाच्या मुद्यावरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही मंत्र्यांनी महाराष्ट्रात ते विधेयक लागु होवू देणार नसल्याची भुमिका घेतली. या मुद्यावरुन महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्तेतून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस बाहेर पडले तरी शिवसेनेचे सरकार वाचविण्यासाठी भाजप पुढे येईल.

जरूर वाचा-शिक्षिका बनू पाहणाऱया अश्वीनीताई बनल्या उद्योजक

देशहिताकडे दुर्लक्ष नको

राज्यातील सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेने देशहिताकडे दुर्लक्ष करू नये, नागरिकत्व विधेयकाला विरोध करण्याच्या कॉंग्रेसच्या भुमिकेचा निषेध करतो. या उर्मटपणाला खतपाणी न घालता शिवसेनेने न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार 'स्थगिती सरकार' आहे. त्यामुळे नागरिकत्व विधेयकाला स्थगिती देऊ नये. सत्तेसाठी राजकारण करण्याचा भाजपचा हेतू कधीचं नव्हता. घुसखोरांना घालविण्याची भाजपची भुमिका असल्याने शिवसेनेशी तडजोड करण्यास तयार असल्याचे आमदार शेलार म्हणाले. 

आमदार शेलार म्हणाले 
- उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवरील पराभवाचे परिक्षण करणार. 
- घुसखोरांना वाचविण्याची कॉंग्रेसची भुमिका. 
- नागरिक सुधारणा विधेयक देशासाठी आवश्‍यक आहे 
- शिवसेनेचं विधेयकाला लोकसभेत समर्थन, मात्र राज्यसभेत पळ. 
- राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा आहे. 
- घुसखोरांना देशातून घालवलंच पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ashish shelar says in press conf.