ज्योतिषांनी निर्भीडपणे शास्त्राचा प्रचार करावा-चांदवडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले. 

नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले. 

कालिका मंदीर सभागृहात आजपासुन दोन दिवसीय ज्योतिष अधिवेशन सुरु झाले. त्याचे उदघाटन श्री. चांदवडकर यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर यतीस्वामी माधवानंद तीर्थ व सर्व आखाड्याचे प्रमुख असलेले स्वामी सागरानंद सरस्वती उपस्थीत होते. ज्योतिष महागुरू श्री, व. दा. भट अध्यक्षस्थानी होते. श्री. चांदवडकर पुढे म्हणाले, ज्योतिष्याला मोठी परंपरा आहे. ज्योतिषांनी अहंकार विरहीत वर्तन ठेवले, निसर्ग रचनेला धरुन वागले.तर त्यांना कोठेही अडचण येणार नाही.आजपर्यंत ज्योतिष परिषदेने देशभर याचा प्रचार केला. त्यामळे देशातील 22 विद्यापीठात ज्योतीष पदवी अभ्यासक्र सुरु झाले आहे. महाराष्ट्रात कालीदास विद्यापीठात हे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. ज्योतिष परिषद सुध्दा 31वर्षा पासुन परीक्षा घेऊन अधिकृत प्रमाणपत्र देत आहे. त्यानंतर ज्योतीष परीषदेचे संस्थापक व.दा भट, सोलापुरचे डॉ.प्रदीप जाधव,पुण्याचे प्रदीप पंडीत, चंद्रकांत शेवाळे,औरंगाबादच्या डॉ.चंद्रकला जोशी डोंबीवलीचे सुनील घैसास यांनी ज्योतीष्य शास्राचे विविध अनुभव व्यक्त केले. स्वामी सागरानंद सरस्वती यांनी सर्व ज्योतिषाना नामस्मरण ,उपासना नित्य करण्याचे आवाहन करुन यशवंत व्हा. कल्याण मस्तु असा आशीर्वाद दिला. 
,डॉ.प्रसन्न मुळ्ये,चंद्रकांत वाघुळदे,प्राजक्ता जोशी, नारायण फडके,धंडीराज पाठक, यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन सौ. श्‍यामला पांगारकर वाघ यांनी केले 

आज समारोप 
समर्थ ज्योतिष व वास्तु,आयादी ज्योतिष वास्तु,आणि स्वस्तिक ज्योतिष व वास्तु यांच्यातर्फे सुरु असलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप उद्या( ता.19) दुपारी चारला होणार आहे. यावेळी प्रसिध्द ज्योतिषी सिध्देश्‍वर मराठकर मार्गदर्शन करतील. 

अनिसचे आव्हाण अन कडेकोट बंदोबस्त 
अंधश्रध्दा निर्मुलन समीतीने या अधीवेशनाच्या निमीत्ताने पुन्हा एकदा ज्योतीष्यांना आवाहन केले. त्यांचे भविष्य खरे असेल तर लोकसभा निवडणुकीचे अचुक निकाल सांगा आणि 21लाखाचे बक्षीस पटकावा. 
मात्र ते आव्हाण येथेही कोणी स्विकारले नाही.तरी सुध्दा वाद उदभवु नये. म्हणुन सकाळ पासुन पोलिस बंदोबस्त तैनात होता. अंधश्रध्दा निमुर्लन समितीच्या आव्हानावर पुण्याच्या इन्स्टीट्यूट ऑफ ओरिएन्टल सायन्सचे संचालक श्री. धुंडीराज पाठक यांनी पत्रकारांना सांगितले की आमचे शास्र सर्वीच्च न्यायालयाने मान्य केले आहे. न्यायालयाच्यावर कोणीही नाही. त्यामुळे आम्हाला ते आव्हाण स्विकारण्याची गरज भासत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news astrologer conference