Video उना दुनीया म्हा आजार आसा...21 दिवस घरम्हांन बसा, कोण म्हणतयं असं पहा..

सुधाकर पाटील
गुरुवार, 26 मार्च 2020

आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतुनच आपण कोणाबद्दल हे गीत लिहले..दोन दिवसापासून डोक्यात होते, आपण आहीराणीत लोकांमधे जनजागृती करायला पाहीजे. त्याअनुशंगाने या गाण्याची निर्मिती केली.  
-गो.शि.म्हसकर कवि नगरदेवळा ( ता.पाचोरा)

भडगाव : कोरोनाच्या जनजागृतीसाठी नाना तह्रेच्या क्लुप्त्या केल्या जात आहे. नगरदेवळा ( ता.पाचोरा) येथील कवी गो.शि.म्हैसकर यांनी कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी अहीराणी भाषेत सुंदर गीत तयार केले आहे. ते गीत ग्रामीण भागात लोकांमधे जनजागृती करण्यासाठी प्रभावी ठरतांना दिसत आहे. यापूर्वी त्यांचे वडील शाहीर शिवाजीराव पाटील यांनीही कोरोना संदर्भात हिंदी भाषात पोवाडा सादर केला आहे.

जिकडे तिकडे सध्या फक्त आणि फक्त कोरोनाचाच विषय कानी पडत आहे. अनेकांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी संदर्भात रचना केल्या. काहींनी कविता, स्लोगन, गीत केल्याचे यानिमित्ताने शोसल मिडीयावर पहायला मिळत आहे. त्याच पाश्वभुमीवर नगरदेवळा येथील कवी गो. शि.म्हसकर यांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी अहीराणी भाषेतील पहीले गीत तयार केले आहे.   

एकवीस दिवस घरमांन बसा.... 
कवी गो.शि.म्हसकर यांनी अहीराणी भाषेत कोरोना संदर्भात अप्रतिम गीतांची रचना केली आहे. "उना दुनीया म्हा आजार आसा...21 दिवस घरम्हांन बसा, नका बाहेर भटकांना, जीव लि टाकी हाऊं विषारी कोराना" हे या गाण्याचे सुरवातीचे बोल आहेत. या गाण्यामुळे ग्रामीण भागातील विशेत: खानदेशात जनजागृती करण्यासाठी सोपे होणार आहे. ग्रामीण भागात तंत्रशुध्द पध्दतीने लक्षात येत नाही. मात्र त्यांच्याच बोली भाषेत हे गीत लिहिल्याने लोकांना कोरोनाची गंभीरता कळण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.  हे गाणे सोशल मिडीयावर आल्यावर अनेकांनी ते व्हायरल केल्याचे पहावयास मिळाले. ई सकाळ च्या फेसबुक पेजवर काही मिनिटातच हजारो लोकांनी ही गाणे पाहीले. 

वडिलांनी ही हिंदीत सादर केला पोवाडा 
कवी गो.शि.म्हसकर यांनी अहीराणी भाषेत कोरोना च्या जनजागृती विडा उचलला. तर त्यांचे वडील शाहीर शिवाजीराव पाटील यांनी ही हिंदीत खास शाहीरी लकाबात कोरोनाच्या जनजागृतीपर पोवाडा सादर केला आहे. त्या पोवाड्याला सोशल मिडीयाने डोक्यावर घेतले होते. तर गो.शि.म्हसकर यांनी अहीराणी भाषेत  सामान्य माणसांना समजेल या शब्दात   गीताची रचना करून जागल्याची भुमिका निभावली आहे. नागरीकांकडुन त्यांचे या गाण्याबद्दल कौतुक होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon corona virus ahirani language song mhaiskar creat