वैजापूरमधून लढण्यासाठी भुजबळांना शेकडो कार्यकर्त्यांनी घातले साकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबियातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरिक कृती समितीच्या वतीने आज वैजापूर येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने शेकडो कार्यकर्त्यांसह येवला संपर्क कार्यालय येथे भेट घेऊन मागणी केली.

   यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड,वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, नीलेश चाफेकर,अशोक देवकर, एल.एम.पवार,
काशिनाथ गायकवाड,सुभाष गायकवाड, अॅड. साईनाथ दारुंटे, डॉ. वाल्मिक बोढरे, गणेश चांगले, निशांत पवार, प्रा. संतोष विरकर,आबासाहेब गायकवाड,भोरु पवार,चंद्रकांत पेहरकर, साहेबराव पडवळ, विजय बनकर, प्रभाकर पवार ,मनोज घोडके,बाळासाहेब शिंदे,पुंडलीक गायकवाड,आदी उपस्थित होते.
 
    भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेत आभार मानले. ते म्हणाले ,मी कुठे उमेदवारी करावी याबाबत पक्ष स्तरावर निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रतिनिधीकडे मांडणे हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे वैजापूर, येवल्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या मी त्यांचा आदर करतो. विधानसभेची निवडणूक भुजबळ कुटुंबातील केवळ दोनच व्यक्ती लढणार आहे. एका वेळेस तीन लोक उमेदवारी करणार नाही त्यामुळे माझ्यासाठी सर्व पत्ते खुले आहे.पक्ष काही निर्णय घेणार असेल तर मी थांबूही शकतो किंवा कोणत्याही मतदारसंघातून लढूही शकतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट करून आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचवू असे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhujbal in vaijapur