esakal | भुसावळ शहरात सात दुकाने फोडली
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

भुसावळ शहरात सात दुकाने फोडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरातील तार ऑफीस रोडवरील सात दुकानांचे शटर तोडून चोरी केल्याची घटना आज (ता. २५) सकाळी उघडकीस आली. एकाच रात्री सात दुकाने फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही दुकाने आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
भुसावळ शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून मुक्कामी होते. काल (ता. २४) ते आपल्या पुढील यात्रेसाठी रवाना झाले. अन्‌ मुख्यमंत्री रवाना होताच रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डाव साधत, शहरातील सात दुकाने फोडली. येथील तार ऑफीस रोडलगत गॅरेज, सलून, खाद्यपदार्थ तसेच इतरही काही दुकाने आहेत. येथून हाकेच्या अंतरावर शहर पोलिस ठाणे, न्यायालय तसेच प्रांत कार्यालय देखील आहे. अशा महत्वपूर्ण कार्यालयाच्या परिसरात ही चोरीची घटना उघडकीस आली आहे. या दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी हजारो रुपये लंपास केल्याचे दुकानदारांच म्हणणे आहे.

loading image
go to top