साखरपुड्यात मुलीने का दिला धनादेश 

अमोल अमोदकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

बोदवड : भारतीय संस्कृतीत मैत्रीला महत्त्वाचे स्थान असून, श्रीकृष्ण अन्‌ सुदामा यांची मैत्री आपल्यासमोर आदर्श आहे. अशाच मैत्रीचे प्रत्यंतर आज दृष्टीस आले, ते म्हणजे नगरसेवक डॉ. सुधीर पाटील यांच्या कन्येच्या साखरपुड्यात. डॉ. पाटील यांची कन्या अनुष्का हीचा आज साखरपुडा आणि वाढदिवस याचे औचित्य साधून अनुष्काने पितृछत्र हरपलेल्या मैत्रिणींना आर्थिक मदत म्हणून 33 हजार रुपयांचा धनादेश दिला. 

शहरातील नगरसेवक डॉ. सुधीर पाटील यांच्या कन्या अनुष्का पाटील यांचा आज वाढदिवस आणि आजचं साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. याचे औचित्य साधून त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. वाढदिवस आणि आजच साखरपुड्याचा कार्यक्रम हा योगायोग जुळून आल्याने, त्यांनी आपल्या वाढदिवसावरील अतिरिक्त खर्च टाळून आपल्या तीन गरीब व गरजू मैत्रिणींना आर्थिक मदत व्हावी, म्हणून हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यातील दोन गरीब आणि गरजू मैत्रिणी की, ज्यांचे पितृछत्र हरपले आहे. तर एक अल्पभूधारक गरीब शेतकरी कुटुंबातील अशा तीन मैत्रिणींना प्रत्येकी हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदतीचा हात दिला. या तिघा गरीब परिवारातील मैत्रिणींच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद म्हणून अनुष्का हिने मदतीचा हात दिला आहे. 

प्रत्येकी 11 हजाराची मदत 
अनुष्का पाटील यांनी भाग्यश्री दिलीप तेली (रा. बोदवड), कविता रामचंद्रसिंह पाटील (रा. वरखेड) आणि श्वेता सतीश पाटील (रा. धोंडखेडा) या आपल्या तिन्ही मैत्रिणींना साखरपुड्यात बोलवून प्रत्येकी 11 हजार रुपयांचा धनादेश दिला. अनुष्का हिने गरजू मैत्रिणींना आर्थिक मदत करून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. या डोळस निर्णयाबद्दल नगरसेवक डॉ. सुधीर पाटील, अनुष्का पाटील,व संपूर्ण पाटील परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal gilr anushka engagement friendship