esakal | coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी रेल्वेगाड्या रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी रेल्वेगाड्या रद्द

coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी रेल्वेगाड्या रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भुसावळ: देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवले जात आहे. यासाठी उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे मुंबई- नागपूर दरम्यान, तब्बल सतरा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर प्लॅटफॉर्म तिकीटाचेही दर १० रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आल्याने आज भुसावळ रेल्वे स्थानकावर शुकशुकाट दिसून आला.

रद्द झालेल्या गाड्यांमध्ये (११२०१) डाउन लोकमान्य टिळक -अजनी एक्सप्रेस वाया मनमाड ही गाडी २३ ते ३० मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. (११२०२) अप अजनी - लोकमान्य टिळक वाया नांदेड मनमाड २० ते २७ मार्चपर्यंत रद्द, (११४०१) डाउन मुंबई-नागपुर नंदीग्राम एक्सप्रेस २३ मार्च ते १ एप्रिल पर्यंत रद्द. (११४०२) अप नागपुर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस २२ ते ३१ मार्चपर्यंत रद्द. (११४१७) डाउन पुणे-नागपुर हमसफर एक्सप्रेस २६ मार्च ते २ एप्रिल पर्यंत रद्द. (११४१८) अप नागपुर-पुणे हमसफर एक्सप्रेस २० ते २७ मार्चपर्यंत, (१२११७) डाउन लोकमान्य टिळक -मनमाड गोदावरी एक्सप्रेस १८ ते ३१ मार्चपर्यंत, (१२११८) अप मनमाड - लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस १८ ते ३१ मार्च, (२२१३९) डाउन पुणे-अजनी एक्सप्रेस २१ ते २८ मार्च, (२२१४०) अप अजनी -पुणे एक्सप्रेस २२ ते २९ मार्च, (२२२२१) डाउन मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस २०, २३, २७ आणि ३० मार्चला रद्द करण्यात आली आहे. (२२२२२) अप हजरत निजामुद्दीन - मुंबई राजधानी एक्सप्रेस २१, २४, २६ आणि ३१ मार्च. (१२२६१) डाउन मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस २५ मार्च आणि १ एप्रिल रोजी रद्द आहे. (१२२६२) अप हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस २४ आणि ३१ मार्च. ( २२१११) डाउन भुसावळ -नागपुर इंटर सिटी एक्सप्रेस वाया इटारसी १८ ते २९ मार्चपर्यंत, ( २२११२) अप नागपुर -भुसावळ इंटर सिटी एक्सप्रेस वाया इटारसी १९ ते ३० मार्च दरम्यान रद्द राहील. तर(११२०५) डाउन लोकमान्य टिळक-निजामाबाद एक्सप्रेस वाया मनमाड  २१ आणि २८ मार्च. (११२०६) अप निजामाबाद-लोकमान्य टिळक एक्सप्रेस वाया मनमाड २२ आणि २९ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.

प्लॅटफार्म तिकीट ५० रुपयात
रेल्वे स्थानकावर वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने भुसावळ विभागातील ९ स्थानकांवर प्लॅटफार्म तिकीटाचे दरात वाढ केली आहे. १७ मार्च ते १५ एप्रिल पर्यंत प्लॅटफार्म तिकीट १० रुपयांऐवजी ५० रुपयाला मिळणार आहे. भुसावळ विभागातील नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेरा, अमरावती आणि खंडवा या स्थानकांचा समावेश आहे.

loading image