दोन तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्या जेरबंद,वनविभागाची कारवाई

ज्ञानेश्वर गुळवे:सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

अस्वली स्टेशन : अनेक दिवसांपासून सांजेगाव येथील शेतशिवारात ठाण मांडून बसलेला बिबट्याला दोन तासाच्या रेस्क्यू नंतर आज दुपारी वनविभागाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे. 

अस्वली स्टेशन : अनेक दिवसांपासून सांजेगाव येथील शेतशिवारात ठाण मांडून बसलेला बिबट्याला दोन तासाच्या रेस्क्यू नंतर आज दुपारी वनविभागाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे. 

  सांजेगाव परिसरातील शेतवस्तीवर अनेक दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. शेतक-यांच्या निदर्शनास येत असलेला बिबट्या अखेर आज पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिज-यात अखेर जेरबंद झाला. गेल्या दोन महिन्यांपासून सांजेगाव येथील बाळू किसन काळे यांच्या मळ्यातील वस्तीवर हा बिबट्या शेतकऱ्यांना निदर्शनास आला होता 
   काही दिवसांपूर्वीच या बिबट्याने या परिसरातील गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या प्राण्यांवर हल्ला केला असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.आज दुपारी अकरा वाजता सांजेगाव येथे बिबट्या पिंज-यात पकडण्याची बातमी परिसरात वा-याच्या वेगाने पसरताच येथील परिसरातील शेतकऱ्यांनी  बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
   

बिबट्या राञी अपराञी येथील मळ्यामध्ये सतत निदर्शनास येत होता. या वस्तीवर अनेक शेतकऱ्यांच्या म्हशी, गायी, शेळ्या, मेंढ्या तसेच लहान मुले देखील असल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतू आज हा बिबट्या अखेर पिंज-यात जेरबंद झाल्याचे समजताच येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अजूनही दोन बिबटे या परिसरात  असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    या परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी शैलेश झुटे, श्रीमती पवार, श्रीमती साबळे, जी.बी.राव, आदींनी या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यात परिश्रम घेतले. 
यावेळी येथील शेतकऱ्यांनी वनविभागाचे कर्मचारी यांचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bibtya