हल्ला करत बिबट्याने तीन शेळ्यांचा पाडला फडशा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

इंदिरानगर(नाशिक) नाशिकच्या पाथर्डी शिवारात आज पहाटे दोनच्या सुमारास संतु डेमसे यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. डेमसे कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने इतर आठ जनावरे सुरक्षित राहिली. अचानक कुत्रे आणि शेळ्यांचा तसेच जनावरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबिय जागे झाले. बिबट्याने गुरांच्या शेडवर हल्ला केल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही माहिती स्थानिक नगरसेवक सुदाम डेमसे यांनी वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील यांना दिली. त्यांनी पंचनामा करत  आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले. ग्रामस्थांनी येथे पिंजरा बसवण्याच्या मागणीचे निवेदन पाटील यांना दिले आहे.

इंदिरानगर(नाशिक) नाशिकच्या पाथर्डी शिवारात आज पहाटे दोनच्या सुमारास संतु डेमसे यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. डेमसे कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने इतर आठ जनावरे सुरक्षित राहिली. अचानक कुत्रे आणि शेळ्यांचा तसेच जनावरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबिय जागे झाले. बिबट्याने गुरांच्या शेडवर हल्ला केल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही माहिती स्थानिक नगरसेवक सुदाम डेमसे यांनी वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील यांना दिली. त्यांनी पंचनामा करत  आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले. ग्रामस्थांनी येथे पिंजरा बसवण्याच्या मागणीचे निवेदन पाटील यांना दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने या भागात बिबट्याचा वावर आढळून आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bibtya attack