esakal | भाजपच्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा फोटो 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

भाजपच्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा फोटो 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बोदवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे शहरात उद्या (ता. २४) आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोदवड तालुका भाजपतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागतपर फलक शहरात जागोजागी लावले जात असून, यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचा फोटो छापून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल चौधरी यांच्या दुकानावर खरेदी विक्री संघाचे चेअरमन रवींद्र वराडे यांचे फलक लावण्यात आले आहे. यात सर्व संचालकांचे फोटो आहेत. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचा फोटो चित्रित करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बोदवड शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत चेअरमन रवींद्र वराडे यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत चौकशी करून सांगतो, असे सांगितले. मात्र यानंतर भ्रमणध्वनी बंद अवस्थेत मिळाला. राष्ट्रवादीचे गटनेता देवेंद्र खेवलकर यांनी फलक हटवण्यात आला असून, या प्रकाराबाबत खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षांनी माफी मागण्याचे आवाहन केले. 
 
भाजपच्या बॅनरवरील फोटो चित्रीकरणाबाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. हा भाजपने केलेला खोडकरपणा आहे. जनतेत गैरसमज पसरवण्याचा हा प्रकार आहे. 
- ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस.

loading image
go to top