सीमा सील: खेडदिगर नाक्यावर वाहनांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जीवनावश्यक वस्तू तसेच शेतकरी संबंधी वस्तू वगळता महाराष्ट्र सीमेवर कुणालाही प्रवेश नाही. मध्यप्रदेश मधून येणाऱ्या वाहनांची विचारपूस करून ते कुठे जातंय व वाहन क्र. दूरध्वनी क्र. याची नोंद करण्याचे येत आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये.
- किरण पवार , साहाय्यक पोलीस निरीक्षक,म्हसावद

ब्राम्हणपुरी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या खेडदिगर येथील सीमा बंद करण्यात आली आहे.मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात येण्यासाठी मध्यप्रदेश मधील खेतीया तर महाराष्ट्रातील खेडदिगरमार्गे प्रवेश होतो. लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर जाणारे मार्ग व राज्यात प्रवेश करणारे मार्ग पूर्णतः बंद आहेत. आरोग्य विभाग ,पोलीस विभाग,प्रादेशिक विभाग संयुक्तकाम करीत आहेत. महत्त्वाच्या कामानिमित्त जाणाऱ्या वाहनांची पूर्ण माहितीची नोंदणी केली जात आहे.

सर्दी खोकल्याचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यास पर्शनल प्रोटेक्शन एक्युपमेंटची कीट व ऐन ९५ ग्रेड मास्क द्यावे असे निर्देश आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ,पेंढारकर,व त्यांच्या पथकाने सीमेवर भेट दिली असून आरोग्यसेवक स्वप्निल नगराळे,बच्छाव नाना तसेच उप विभागीय पोलीस अधीक्षक सपकाळे व साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी ही भेट दिली.

संशयित रुग्ण आढ ळल्यास करायची उपाय योजनेबाबत सूचना दिल्या आहेत. आतर राज्य पॉइंट असल्याने परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
- राजेंद्र पेंढारकर , तालुका आरोग्य अधिकारी शहादा

बाहेरून गावाहून आलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे व मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशयनवे सर्व दुकाने पान टपरी आदी याना नोटिसा लावण्यात आल्या आहेत तसेच पुरवठादार दार जसे राशनदुकांदार,किरानादुकांदार,दूध वाले आदी ची ही यादी तयार करण्यात आली असून ती पंचायत समिती शहादा येथे जमा करायची आहे व ग्रामस्थांनी विना करण घरातून निघणे टाळावे व स्वतःचे रक्षण करून आपल्या कुटुंबाचे ही काळजी घ्यावी

- अरुण गवळे, ग्रामसेवक ग्रा.पं.खेडदिगर ,ता.शहादा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news brahmpuri Border seal: Vehicle inspection at Kheddigar Nose