esakal | पंधरा हजारांची लाच स्विकारताना ग्रामसेवक जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

पंधरा हजारांची लाच स्विकारताना ग्रामसेवक जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येवला : रहिवासी दाखल्या साठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास लाच लुचपत  प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचत लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे . जनार्दन कचरु वाघ वय-५२, असे  या ग्रामसेवकाचे नाव असून त्यास ताब्यात घेतले आहे .                                                                            
तक्रारदार यांना त्याच्या मुलाचे सैनिक स्कुल, सातारा येथे अँडमिशन करण्यासाठी आवश्यक असणारा ग्रामसेवक यांचा नागडे गांव येथील रहिवासी दाखला देण्यासाठी तसेच तहसिल कार्यालय व प्रांत कार्यालय, येवला येथुन जातप्रमाणपत्र व डोमेसाईल प्रमाणपत्र त्वरित काढुन देण्यासाठीची मदत करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे २०,०००/- रूपये. लाचेची मागणी आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष   करून तडजोडअंती १५,०००/-₹ घेण्याचे मान्य केले व सदर लाचेची रक्कम येवला बस स्टॅण्ड जवळील चहाच्या टपरीत पंचासमक्ष स्वीकारली.

या प्रकरणी नाशिक येथील तपासी अधिकारी विजय जाधव , पोलीस उप- अधिक्षक, पो.नाईक प्रकाश डोंगरे, ,पो.नाईक शाम पाटील, पो.नाईक प्रविण महाजन, पो. हवा. चंद्रशेखर मोरे, चा.पो. संतोष गांगुर्डे आदी तपास करीत आहे .

loading image
go to top