तीन तरूणांचे तगडे आव्‍हान 

तीन तरूणांचे तगडे आव्‍हान 

गुजरात राज्‍यात लोकसभा निवडणूकीच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍याच्‍या निवडणूकीची प्रक्रीया सुरू होण्या अगोदरच ओबीसी समाजाचे नेते अल्‍पेश ठाकूर यांनी कॉग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्‍याने काँग्रेस पक्षाला धडकी भरली आहे,त्‍यात अल्‍पेश यांची नेमकी भूमिका स्‍पष्ट न झाल्‍याने भाजपवर देखील त्‍याचा विपरित परिणाम होणार आहे. राज्‍यात ओबीसींची सरासरी ४५ टक्‍के मते असतांना या समाजाचे प्रभावी नेतृत्‍व करणाऱ्या अल्‍पेश यांच्‍या या निर्णयाने गुजरात राज्‍यात जातीय समीकरणे बदलणार आहेत. 

विशेष म्‍हणजे २०१६ च्‍या लोकसभा निवडणूकीत भाजपला मोदी त्‍सुनामीमुळे दणदणीत विजय मिळाला होता मात्र त्‍यानंतर झालेल्‍या राज्‍यातील विधानसभा निवडणूकीत भाजपला सत्ता मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती, हा इतिहास जुना नाही.आता अल्पेश त्‍यांच्‍या मतदारांना नेमके काय आवाहन करतात यावर काँग्रेस - भाजप खासदारांची संख्या निश्‍चीत होईल. 

राज्‍यात पाटीदार समाजाच्‍या आंदोलनामुळे हार्दिक पटेल यांचा उदय होणे, दलित समाजाचे नेतृत्‍व करणाऱ्या जिग्‍नेश मेवानी यांनी आपला प्रभाव सिध्द करणे आणि अल्‍पेश ठाकूर यांनी ओबीसींना सोबत घेऊन चळवळ उभी करणे या घडामोडी तेवत ठेवीत या तीन तरूण नेत्‍यांनी गुजरातच्‍या राजकारणाची दिशा बदलून टाकली आहे. या नेत्‍यांचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही. राज्‍यात अनेक काळ सत्तेत असणाऱ्या भाजप आणि काँग्रेस पक्षाला या नेत्‍यांशी जवळीक साधण्याशिवाय पर्याय उरला नाही अशी परिस्‍थीती या तरूणांनी निर्माण केल्‍याने ऐन निवडणूकीच्‍या तोंडावर अल्‍पेश यांचे काँग्रेसवर नाराज होणे या पक्षासाठी नक्‍कीच धक्‍कादायक आहे,शिवाय हार्दिक पटेल यांनी त्‍यांना भाजपात न जाण्याचा सल्‍ला देणे हे भाजपसाठी त्रासदायक ठरणार आहे. आता या घडामोडींमुळे भाजपला राज्‍यात २६ जागांवर आपले अस्‍तित्‍व कायम राखणे अवघड होऊन बसले आहे. या दोन्ही प्रस्‍थापित पक्षांसाठी हे तीन तरूण चक्क थ्री ईडियटस ठरत आहेत. 

राज्‍यात झालेल्‍या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाशी जवळीक साधून अल्‍पेश यांनी सहा जागांवर निवडणूक लढविली आणि त्‍यातील चार उमेदवार निवडून आणलेत.त्‍यात अल्‍पेश हे राधनपूरमधून ८६ हजार मतांनी जिंकले होते.त्‍यांनी क्षत्रिय ठाकोर सेना आणि एकता मंचची स्‍थापना केली.ज्‍या समाजाचे अल्‍पेश नेतृत्‍व करतात त्‍यात त्‍यांच्‍या समाजाचे ३६ टक्‍के मतदार आहेत.राज्‍यातील साबरकांता,बनासकांता,पाटण,मेहसाना या भागात हा मतदार विखुरला आहे.गांधीनगर,खेडा,पंचमहाल,सुरेंद्रनगर येथेही त्‍यांचा प्रभाव अधिक आहे.त्‍यामुळे कॉंग्रेस पक्षावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. काँग्रेसपक्षाला यातून काहीच कळले नाही एवढा हा पक्ष नवखा नाही.त्‍यामुळे त्‍यांची राज्यातून या निवडणूकीत यावेळी जास्‍तीत जास्‍त खासदार पाठवायचे ही अपेक्षा अल्‍पेशच्‍या भूमिकेमुळे धुळीस मिळाली एवढे नक्‍की.लोकसभा निवडणूकीत गेल्‍यावेळी भाजपने सर्व २६ जागा जिंकून बाजी मारली होती.विधानसभा निवडणूकीनंतर उर्जा मिळालेल्‍या काँग्रेसला लोकसभेत यश मिळेल अशी खात्री होती.तीन तरूण नेत्‍यांची साथ त्‍यावेळी काँग्रेसला तारक ठरली मात्र आता हे तीन तरूण भाजपविरोधी सूर आळवित असतील तर भाजपसाठी देखील त्‍यांची भूमिका मारक ठरणार आहे. 

लोकसभेच्‍या एकूण जागाः २६ 

पुरूष मतदारः२.३२,५६,६८८ 
महिला मतदारः २.१४,८८४३७ 
(आकडे कोटीत) 
 
समाजाचे प्रभावी नेतृत्‍व 
जिग्‍नेश मेवानी ः दलित 
अल्‍पेश ठाकोर ः ओबीसी 
हार्दिक पटेल ः पाटीदार 


समाजनिहाय वर्गीकरणः 
(सरासरी) 

४५ टक्के ओबीसी 
२२ टक्‍के कोळी ठाकोर 
२० टक्‍के गैर कोळी ठाकोर 
९.५टक्‍के मुस्‍लीम 
१४ टक्‍के पाटीदार 
१५ टक्‍के इतर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com