छगन भुजबळांसाठी गड आला पण सिंह गेला...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

नाशिक ः जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या यशामागे माजी मंत्री छगन भुजबळ यांचे आडाखे प्रभावी ठरल्याने राज्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागांत नाशिकचा वाटा वाढला. पण त्यांना मुलगा पंकज भुजबळ यांच्या पराभवाचे शल्य राहील. 

नाशिक ः जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या यशामागे माजी मंत्री छगन भुजबळ यांचे आडाखे प्रभावी ठरल्याने राज्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागांत नाशिकचा वाटा वाढला. पण त्यांना मुलगा पंकज भुजबळ यांच्या पराभवाचे शल्य राहील. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती फारशी चांगली नव्हती. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने पक्ष शक्तिहीन झाला होता. राज्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावल्यागत गाव ना गाव पिंजून काढत असताना जिल्ह्याची सूत्रे छगन भुजबळ यांनी हाती घेतली. प्रत्येक मतदारसंघाचा त्यांचा अभ्यास असल्याने कुठे काय आडाखे आखायचे?, याचे सूक्ष्म नियोजन भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. भुजबळ यांचे आडाखे फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरते मर्यादित नव्हते, तर राष्ट्रवादीपेक्षा अधिक शक्तिहीन झालेल्या कॉंग्रेससाठी होते. त्याचाच एक भाग म्हणून इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघासाठी भुजबळांनी राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर हे कॉंग्रेसला उमेदवार म्हणून दिले. खोसकरांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

राज्यभरातील पक्षांतराच्या वाऱ्यात कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा गावितांनी दिल्याने जिल्हा सहभागी झाल्याची सल भुजबळांच्या मनात होती. निफाडमध्ये दिलीप बनकर, तर सिन्नरमध्ये ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजय मिळाला. दिंडोरीत विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांचा विजय निश्‍चित होता. फक्त किती मतांची आघाडी मिळणार एवढाच विषय होता. कळवणमध्ये नितीन पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा विजयाचा झेंडा रोवला. देवळालीत ऐनवेळी सरोज अहिरे यांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने घोलपांसमोर आव्हान निर्माण केले. "ऍन्टी इन्कम्बन्सी'चा फायदा मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chagan bhujbal