वहिवाटीच्या रस्त्यावरून घडले भलतेच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सोबत असलेल्या महिलेचा हात धरून चापटा बुक्‍यांनी मारहाण करून शिवीगाळ केली;

मेहुणबारे (ता.चाळीसगाव, जि. जळगाव)  : कळमडू (ता.चाळीसगाव) येथे शेताच्या वहिवाटीच्या रस्त्याचे जाण्या- येण्यावरून हाणामारीची घटना नुकतीच घडली. या घटनेदरम्यान असलेल्या महिलेशी अश्‍लिल वर्तन करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत करण्याचा प्रकार घडला. तर तिघेजण जखमी झाले असून, याप्रकरणी पाच जणांविरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आवर्जून वाचा - दोन दिवसांवर विवाह अन्‌ तिच्याबाबतीत घडले अघटीतच 

कळमडू (ता. चाळीसगाव) येथे शेती वहिवाट रस्त्याच्या जाण्या येण्यावरून संशयित आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून गावातील सुनील साहेबराव पाटील, साहेबराव तुळशीराम पाटील व लोकेश सुनील पाटील यांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सोबत असलेल्या महिलेचा हात धरून चापटा बुक्‍यांनी मारहाण करून शिवीगाळ केली; व महिलेस अश्‍लिल भाषा वापरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

सायंकाळी घडली घटना 
सदर घटना 25 एप्रिलला सायंकाळी सहाच्या सुमारास कळमडू शिवारात शेताचे बांधावर घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गोकुळ प्रल्हाद पाटील, सोपान गोकुळ पाटील, सुदाम गोकुळ पाटील, संभाजी वसंत पाटील व वसंत प्रल्हाद पाटील यांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार पृथ्वीराज कुमावत हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon farm road heat four people