आधीच लॉकडाउनमुळे शेतीमाल 'डाउन', अन् आता हे अस्मानी संकट...

banana
banana

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : आधीच कोरोनामुळे शेती मालाला कुणीही विचारेना अशी स्थिती असतांना त्यात रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी वार्यासह पाऊस झाला व तुरळक गारपिटीने वरखेडे,तिरपोळे, पिंपळवाड म्हाळसा (ता.चाळीसगाव)परिसरातील केळी उत्पादक शेतकरी उध्दवस्त झाला आहे.या वादळाने शेतकऱ्यांच्या ताटातील घास हिरावून नेला असून लाखो रूपयांची कटाईवर आलेली केळी वादळाने उध्वस्त केली आहे. या अनपेक्षीत वादळाने शेतकऱ्यांने होत्याचे नव्हते करून टाकले.

कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी केली आहे. वरखेडे व तिरपोळे  हेनटर व तिरपोळे या दोन्ही शिवरात जवळपास 45 हेक्टरवर केळी वादळामुळे जमिनदोस्त झाली आहे.केळी बरोबरच कांदा, मका, लिंबू यांनाही फटका बसला आहे.

दोन महिन्यापासून कोरोना नावाचे वादळ शेतकऱ्यांच्या उरावर बसले आहे.हाता तोंडाशी आलेला घास या कोरोनाने हिसकावून नेला आहे.कोरोनामुळे कापणीवर आलेली केळी घेण्यास व्यापारी पुढे धजावेना अशी केळी उत्पादकांची स्थिती आहे. रात्रंदिवस मेहनत करून लाखो रूपये खर्च करून शेतकऱ्यांनी केळी जागवली आणि उत्पादन तयार झाले असतांनाच कोरोनाचे जीवघेणे संकट आले.या संकाटामुळे जीवतोड मेहनत घेऊन वर्षभर जगवलेली केळीवर पाणी फिरवून देण्याची वेळ आली. असे असूनही शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात केळी विकून झालेले नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला.

वादळाने केले नुकसान
वरखेडे परिसरात झालेल्या नुकसानीने केळी पीक उध्वस्त झाले आहे.बहुतांश शेतात केळी कापणीला आली आहे.व्यापारी केळी खरेदी करण्यासाठी पुढे येत नसल्याने शेतकरी आस्मानी संकटात सापडला असतांना या वादळाच्या रुपाने तालुक्यात सुलतानी संकट कोसळले. त्यात वादळाने शेतकऱ्यांचा अक्षरशा घात केला.डोळ्यादेखत केळीचे पिक जमिनदोस्त झाले. आधीच कोरोनामुळे शेतकरी हतबल झालेला असतांना दुसरीकडे वादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. रविवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेच्या दरम्यान वरखेडे बुद्रूक, वरखेडे खुर्द, तिरपोळे, पिंपळवाड म्हाळसा  आदी भागात वादळाने अक्षरशा थैमान घातले. काही वेळ गारही पडली. या वादळानेमुळे कापणीवर आलेली केळी अक्षरशा भुईसपाट झाली. तर कांदे, मका, लिंबू आदी पिकांनाही जबर फटका बसला. सर्वाधिक नुकसान केळीचे झाले. 

शेतकऱ्यांना रडू कोसळले
हातातोंडाशी आलेली केळीचे खांब वादळाने जमिनदोस्त झाले. वषेभर कष्ट करून जगवलेली केळी अशी जमिनदोस्त होतांना शेतकऱ्यांना अक्षरशा रडू कोसळले.संकट केवळ शेतकऱ्यांवरच का असा काळीज चिरणारा सवाल या शेतकऱ्यांनी केला.वादळामुळे वरखेडे तिरपोळे या शिवारात ४५ हेक्टरवर क्षेत्रातील केळी मातीमोल ठरली  वरखेडे येथील वामन मालसिंग पाटील यांचे पाच हजार केळीचे खोड  वादळात जमिनदोस्त झाली.ही केळी आता कापणीला होती.तिरपोळे शिवारात गोरख धर्मा पाटील यांचे 5000 हजार केळीचे खांब जमिनदोस्त झाली.  भगवान पाटील संतोष गवारे रूपसिंग पवार कोमलसिंग पवार,सुरसिंग पवार ,शिवसिंग पवार, तसेच वरखेडे खुर्द  येथील बालु तिरमली, अनिल तिरमली, तिरोनाबाई पाटील,हिराचंद तिरमली आदी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
तसेच कापणीवर आलेला मका, लिंबू, कांदा या पिकांचेही वादळामुळे गारपीटने  नुकसान झाले आहे. हे नुकसान 50 ते 60 लाख रूपयांच्या घरात आहे. दरम्यान या नुकसानीचा पंचनामा कृषी सहाय्यक अविनाश चंदिले, डी.एस चव्हाण, ए. डी. वाघ यांच्यासह पोलीस पाटील व शेतकरी उपस्थित होते.

वरखेडे येथे  14 तास विज गुल
वरखेडे परीसरात काल झालेल्या वादाळामुळे विजेचा तार तुटला होता. या भागात वादळी वाऱ्याने झोडपून काढले.वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.मेहूबारे येथे वादळामुळे झाड विद्युत तारेवर पडल्याने काल सायंकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. सुमारे 14 तास वीज बंद होती. वाढते तापमान आणि कमालीचा उकाडा यामुळे हवालदील झालेल्या नागरीकांना रात्रभर विज नसल्याने रात्र जागून काढावी लागली. तब्बल 14 तासानंतर आज सकाळी वीज पुरवठा सुरु झाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com