esakal | बनावट पास घेवून कारमधून प्रवास...पोलिसांनी घेतले ताब्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

police

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला.कारमधून बेकायदा प्रवास करणाऱ्या 3 महिला. 1 पुरूष आणि 5 लहान मुले व कार चालक अशांना ताब्यात घेण्यात आले असून त्यंना चाळीसगाव महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बनावट पास घेवून कारमधून प्रवास...पोलिसांनी घेतले ताब्यात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कोरोना संसर्गाचा विषाणू फैलावु नये म्हणून 35 दिवसापासून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस बंदी आहे.असे असूनही पोलीस उपनिरीक्षकांचा बनावट पास तयार करून आंध्र प्रदेशातील हैदराबादहून थेट हरीयाणा राज्य गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारूती शिफ्ट कारचालकाचा बनाव धुळे रस्त्यावरील तरवाडे बारीवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला.कारमधून बेकायदा प्रवास करणाऱ्या 3 महिला. 1 पुरूष आणि 5 लहान मुले व कार चालक अशांना ताब्यात घेण्यात आले असून त्यंना चाळीसगाव महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मालेगाव, धुळे व जळगाव मध्ये वाढत्या कोरोना रूग्णाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सीमाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशान्वये धुळे रस्त्यावर तरवाडे बारीजवळ गस्त घातली जात आहे.चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय साठे व  सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास गस्त घालत असतांना चाळीसगावकडून (एच.आर.26 सीएम.7713) ही शिफ्टकार धुळेकडे जात असतांना थांबवली.कारमध्ये 3 महिला, 1 पुरूष व 5 लहान मुले होते. हे सर्व लोक हैदराबादहून हरीयाणा राज्यात जात होते.त्यांच्याजवळ बँगलोर येथील पोलीस उपनिरीक्षकाचा प्रवास परवानगी पास होता.

नऊ जणांना घेतले ताब्यात
तरवाडे बारीत  उपनिरीकक्ष साठे यांनी ह्या गाडीतील सर्वांची उडवाउडवीची उत्तरे देत लक्षात येताच सदरील माहिती मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांना दिली. बेंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक साठे यांनी कारचालक पवनसिंग इंद्रसिंग रा. चांदवली ता. राजवड, तुरु (राजस्थान) याची सखोल चौकशी करून बंगलोर येथे कार चालकाच्या मित्राला फोन लावला असता त्यालाही त्याचे मित्रांणे दिले सांगितले परंतु त्याचा मित्राचा फोन लागत नसल्याने   पोलीस उपनिरीक्षकाच्या नावाचा बनावट पास दिल्याचा संशय आल्यावर कारचालकांसह नऊ जणांना ताब्यात घेतले. वाहनचालकाने जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी तसेच कोरोना संसर्ग प्रतिबंधीत नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक उपद्रव पसरविण्यासाठी कृती केली म्हणून मेहूणबारे  पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिरीक्षक साठे यांची सतर्कता 
कोरोना व्हायरसमुळे प्रवासी वाहतुक बंद असतांना देखील पोलीस अधिकाऱ्याचा नावाचा बनावट पासवर हैद्राबाद ते हरयाणा हा हजारो किमी प्रवास जीव धोक्यात घालून चालकाने केल्याने उघड झाले आहे. विशेष म्हणजे हैद्राबादहून निघालेली या शिफ्ट कारला चाळीसगाव तरवाडे बारी येईपर्यंत अनेक चेक नाक्यावर कुणीच अडवले नाही. अडवले असले तरी पोलीस उपनिरीक्षकाच्या नावाचा पास खरा आहे की खोटा याची खात्री न करताच प्रवासाला मुभा दिली याचे आश्चर्श वाटत आहे. मात्र  पोलीसांनी हा बनाव हाणून पाडला. चालकांसह त्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना चाळीसगाव महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय साठे यांनी दाखवलेल्या समयसुचकेमुळे पोलीस निरीक्षकाच्या बनावट पासवर हजारो किमी प्रवास पार पाडणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे.चार दिवसापूर्वीही चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी चक्क आरटीओ आणि पोलीस प्लेट लावून प्रवासी वाहतुक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता.