जेवणावरून भावांचे भांडण...वाद अंगणात आला अन्‌ काकाचा झाला शेवट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

दोघा भावांमध्ये शेतीच्या बांधावरून किरकोळ वाद होते. त्यातच आज गुरुवारी सकाळी संशयीत आरोपी निखील बंडू पाटील (30) व गौरव बंडू पाटील (24) यांच्यात त्यांच्या घरात जेवणावरून वाद झाले. दोघांच्या आई वडिलांनी जो स्वयंपाक केला तोच खावा लागेल असे सांगितले. हा वाद सुरू असतांना निखीलचा चुलत भाऊ महेश धोंडू पाटील (वय27) हा वाद सोडवण्यासाठी आला.

मेहुणबारे (जळगाव) : शेतीच्या बांधाच्या वादातून पुतण्याने दिवसाढवळ्या सख्ख्या काकाचा पोटात सुरी खुपसून खून केल्याची खळबळजनक घटना  पिलखोड (ता.चाळीसगाव) येथे आज दुपारी घडली. या हल्ल्यात मुलगाही गंभीर जखमी झाला असून पोलीसांनी खून प्रकरणी दोघा सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

शेतीचा होता वाद...
पिलखोड (ता.चाळीसगाव) येथे मयत धोंडू सुपडू पाटील (वय55) व बंडू सुपडू पाटील या दोघा भावांमध्ये शेतीच्या बांधावरून किरकोळ वाद होते. त्यातच आज गुरुवारी सकाळी संशयीत आरोपी निखील बंडू पाटील (30) व गौरव बंडू पाटील (24) यांच्यात त्यांच्या घरात जेवणावरून वाद झाले. दोघांच्या आई वडिलांनी जो स्वयंपाक केला तोच खावा लागेल असे सांगितले. हा वाद सुरू असतांना निखीलचा चुलत भाऊ महेश धोंडू पाटील (वय27) हा वाद सोडवण्यासाठी आला. त्यावेळी निखील व गौरव यांनी महेश याला तु का आला असे सांगत त्याच्याशी वाद घातला. त्यावेळी महेश याचे वडील धोंडू पाटील हे अंगणात आले; तुम्ही घरात का वाद घालत आहेत असे  बोलत असतांना गौरवने  स्वयंपाकघरातील चाकू घेऊन घराबाहेर उभ्या असलेल्या धोंडू पाटील यांच्या पोटात खुपसला. त्यावेळी महेश हा  वडिलांना वाचविण्यासाठी धावला असता त्याच्या खांद्याजवळ पाठीत सुरा खुपसला. सुरीचा गंभीर वार झाल्याने दोघे बाप लेक जमिनीवर कोसळले. 

रसत्यातच एकाचा मृत्यु 
पिलखोड (ता.चाळीसगाव) येथुन जखमी झालेले  धोंडू  पाटील व त्यांचा मुलगा महेश या दोघांना नातेवाईकांनी तात्काळ  उपचारासाठी चाळीसगाव घेऊन जात  असतांना रस्त्यातच धोंडू पाटील यांचा मृत्यु झाला. यात  गंभीर जखमी झालेल्या महेश पाटील यास चाळीसगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलीसांची घटनास्थळी धाव
पिलखोड (ता.चाळीसगाव) येथे खून झाल्याची माहिती मिळताच मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, हवालदार कमलेश राजपूत सिद्धांत शिसोदे यांनी तात्काळ धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलीसांनी दोघा संशयित सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे.घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी मेहूणबारे पोलीस ठाण्यात भेट देवून घटनेची माहिती घेतली.मयत धोंडू पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला तर गंभीर जखमी झालेल्या महेश पाटील याच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon two Brothers quarrel and uncal copper attack