esakal | उमराण्यात अल्पवयीन भाचीवर मामाचा बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

उमराण्यात अल्पवयीन भाचीवर मामाचा बलात्कार

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार सकाळ वृत्तसेवा

देवळा :  उमराणे ता.देवळा येथील अल्पवयीन भाचीवर सख्ख्या मामाने बलात्कार करीत नात्याला काळिमा फासल्याची घटना घडली असून या घटनेचा संपूर्ण तालुक्यातून निषेध केला जात आहे. 
     

  देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमराणे ता.देवळा येथे संशयित आरोपी मंगल उर्फ अमित घनश्याम जांझोड ( वय ३५ वर्ष) हा आपल्या आई व भाचीसह काल शुक्रवार (ता.२३) रात्रीचे जेवण आटोपून त्यांच्या घरात झोपले असता रात्रीच्या वेळी संशयित आरोपी अमित याने आपल्या सख्ख्या भाचीस चाकूचा धाक दाखवून व जीवे ठार मारण्याची धमकी देत घरातून बाहेर नेले. नदीत घेऊन गेल्यानंतर एका झाडाखाली तिच्यावर बलात्कार केला. याबाबत जर कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या आजीला मारून टाकेलं अशी धमकी दिली. 
         सकाळी मुलीने घाबरून भोपाळ येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या वडिलांना घटनेची माहिती सांगितली. तिच्या वडिलांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. नाशिक येथून पोलीस यंत्रणेने तातडीने देवळा पोलिसांशी संपर्क केला.घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत संशयित आरोपीला याची कुणकुण लागल्याने त्याने घरातून पलायन केले.देवळा पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर संशयित आरोपी कुठे राहतो असे विचारले असता तो मुंबईला जाईल असे पोलिसांना नातेवाईकांनी सांगितल्यानंतर देवळा पोलीस मनमाडच्या दिशेने रवाना झाले व संशयित आरोपीला मनमाड येथील भाबडवस्तीतुन पळून जाण्याच्या बेतात असताना शिताफीने त्याला ताब्यात घेतले .उमराणे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मोठाभाऊ बच्छाव, योगेश क्षीरसागर यांनी संशयित आरोपीला मनमाड येथून ताब्यात घेतले.याबाबत देवळा पोलिसात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे करीत आहेत.  संशयित आरोपी हा बलात्कारच्या गुन्ह्यात यापूर्वीही सिद्धदोशी आरोपी असून १३ ऑगस्टलाच शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता

loading image
go to top