महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या हिताचेच : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

चोपडा : कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी व बेरोजगारी घालविण्यासाठी सत्तेचा वापर करायचा आहे. यासाठी तुमची साथ हवी आहे आणि ती साथ असेल यात शंका नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे राज्याचा हिताचेच सरकार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे केले. 

हेपण वाचा - "औरंगाबादहून जळगाव यायचं म्हंटलं तर सुरवातीला अंग चेपायची व्यवस्था करावी...

चोपडा : कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी व बेरोजगारी घालविण्यासाठी सत्तेचा वापर करायचा आहे. यासाठी तुमची साथ हवी आहे आणि ती साथ असेल यात शंका नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे राज्याचा हिताचेच सरकार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे केले. 

हेपण वाचा - "औरंगाबादहून जळगाव यायचं म्हंटलं तर सुरवातीला अंग चेपायची व्यवस्था करावी...

तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या २५ हजार चात्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कामगार राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील, सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. सुरेश जी. पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल भाईदास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार तथा सूतगिरणी अध्यक्ष कैलास पाटील व्यासपीठावर होते. 
श्री. पवार म्हणाले, की पिकविणारा जगला तर खाणाऱ्याच्या ताटात येईल या दोन्हींचा विचार होणे गरजेचे आहे. कोण जीव देतो ? जीव देणे ही सोपी गोष्ट आहे का ? त्याला सहन होत नाही त्याच्यात ताकद नाही त्या शेतकऱ्यांना आपण ताकद देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेतकरी म्हणतो मला कर्जमाफी नको, भीक नको त्यास फक्त चांगले बियाणे, उत्पादित शेतीमालास रास्त भाव, शिक्षण व आरोग्याची सोय व्हावी हीच अपेक्षा असते. शेती, व्यापार, उद्योग अडचणीत आले असल्याने मंदीची लाट आहे. व्यापार वाढत नसल्याने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. कर्जबाजारीपणा वाढलेला आहे. कारखानदारी, व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. 

मी रिमोट कंट्रोल नाही 
माजी आमदार कैलास पाटील यांनी भाषणातून शरद पवार हे महाराष्ट्राचे रिमोट कंट्रोल आहेत असे सांगितले. मात्र, श्री. पवार यांनी त्यांच्या भाषणात या बाबीचा उल्लेख करत सांगितले, की आपण महाराष्ट्राचे रिमोट कंट्रोल आहात असे मी ऐकले. मात्र, आता सर्व काही उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. एकदा जागेवर बसल्यानंतर माणसे पक्की होतात. मी रिमोट कंट्रोल वैगेरे काही नाही, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमधध्ये हशा पिकला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda ncp sharad pawar mahavikas aaghadi goverment