सत्तरच्या दशकातील कोरडवाहूत डोलतोय गहू ! 

Wheat
Wheat

गणपूर (ता. चोपडा) : रब्बीत येणारा गहू खानदेशातील शेतकऱ्यांना नवा नाही. मात्र, एक गहू त्याचे प्रकार बहू, अशी म्हण असलेला कोरडवाहू क्षेत्रावरचा गहू यावर्षी मुडावद (ता. शिंदखेडा) शिवारात वाऱ्यावरच्या लहरींबरोबर डोलताना दिसू लागला आहे. सध्या ऐकिवात नसले तरी ७० च्या दशकात खानदेशात कोरडवाहू क्षेत्रात गहू येत असल्याचा इतिहास आहे. 
खानदेशात १९७५- १९८० पर्यंत कोरडवाहू क्षेत्रात तत्कालीन बंशी गहू येत होता. हे आता साठीत असणाऱ्यांनी अनुभवले आहे. १९९० पर्यंत लासूर, चौगाव भागात कोरडवाहूत जवस पिकत होती. त्या काळात बागायती नसल्याने जमिनीचा पोत भारी होता. कोरडची दादर, हरभरा, धने, जवस आजही ठराविक भागात होतात. मात्र, गहू ऐकिवात नाही. 

चांगल्या पावसाने प्रयोग यशस्वी 
गहू सध्या ओंबी भरण्याच्या तयारीत असून तो गावचो लावून पेरला आहे. हा गहू गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत असून यंदाच्या चांगल्या पावसामुळे जमिनीतील ओल लक्षात घेता हा प्रयोग पुन्हा यशस्वी होण्यास बळकटी मिळाली आहे, एवढे मात्र निश्चित! 

गतवर्षीही घेतले होते पीक
मुडावद येथील भरत महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार मुडावद येथील यदनेश्वर पुंडलिक महाजन यांच्यासह चार शेतकऱ्यांनी पाष्टे येथील मंगेश सोनवणे यांच्याकडून बियाणे आणून कोरडवाहुतील गहूचा प्रयोग केला आहे. त्यांनी सिल्लोड येथून बियाणे मागवून गेल्यावर्षी हे पीक घेतल्याचे महाजन यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com