आयुक्सांसह अधिकाऱ्यांना घेरण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नगरसेवकांना दुखावणाऱ्या कार्यशैली विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करूनही त्याचा फारसा फायदा होत नाही. वॉक विथ कमिशनर उपक्रमाच्या माध्यमातून आयुक्त मुंढे नगरसेवकांवर "वॉर' करण्याची एकही संधी सोडतं नसल्याने नगरसेवक व प्रशासनात तुंबळ शाब्दीक युध्द सुरु आहे. यापार्श्‍वभूमीवर आयुक्तांसह प्रशासनातील अधिकायांना घेरण्याची तयारी सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी केली असून साथीचे आजार व परसेवेतील अधिकारऱ्यांना वगळून स्थानिक अधिकाऱ्यांची चौकशीचे मुद्दे प्रशासनाची कसोटी पाहणारे ठरणार आहे. 

महापालिकेचे सभा शुक्रवारी (ता. 19) साडे अकरा वाजता होणार आहे. विषय पत्रिकेवर तीनचं विषय असले तरी साथीचे आजारांवरून प्रथम प्रशासनाला घेरले जाणार असून विरोधी पक्षांनी तशी जय्यत तयारी केली आहे.
 
आयुक्त वॉक विथ कमिशनर उपक्रमाच्या माध्यमातून शहराचे कामकाज किती पारदर्शी चालल्याचे दर्शवित असल्याने त्याचाचं आधार घेत स्वाईन फ्ल्यु, डेंगीच्या आजाराने शहराची केलेली दयनिय अवस्था प्रशासनासमोर मांडून घेरले जाणार आहे. विशेष म्हणजे लक्षवेधी सुचना दाखल लवकर दाखल करून न घेणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी साथीच्या आजारांवरील शिवसेनेची लक्षवेधी दाखल करून घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांनी प्रशासनाला खिंडीत गाठण्याची जोरदार तयारी केली आहे. 
 
स्थानिक विरुध्द परसेवा वाद 
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पालिकेच्या सेवेत परसेवेतील अधिकाऱ्याचे वर्चस्व वाढल्याने स्थानिक विरुध्द परसेवेतील अधिकारी असा सुप्त संघर्ष पालिकेत सुरु आहे. त्यातचं प्रशासनाने ग्रीन फिल्ड प्रकरण तसेच अन्य प्रकरणात स्थानिक अधिकाऱ्यांना दोषी धरून विभागिय चौकशी लावल्याने त्याची माहिती महासभेवर सादर केल्याने या मुद्यावर प्रशासनाला भाजपकडून खिंडीत पकडण्याची तयारी करण्यात आली आहे. बुधवारी भाजपच्या पार्टी मिटींग मध्ये यावर चर्चा करण्यासाठी भाजप नगरसेवकांमधील दोन वकिलांना पुराव्यानिशी माहिती सादर करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. 

Web Title: marathi news COMMISSIONER AND COR PORTER