राज्यात ४७० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप 

राज्यात ४७० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप 

गणपूर (ता. चोपडा) ः राज्यात यावर्षी बऱ्याच भागात ऊस अभावी कारखान्यांचे गाळप बंद राहिले असले, तरी आतापर्यंत ४७०.५३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. ५२०.६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर आतापर्यंतचा सरासरी साखर उतारा ११.०६ इतका राहिला आहे. 

राज्यात आठही विभागातून सहकारी आणि खासगी मिळून यावर्षी १४६ साखर कारखाने सुरू झाले. त्यात कोल्हापूरमधून ३५, पुण्यातून ३०, सोलापूरमधून २८, अहमदनगर १६, औरंगाबादमधून १९, नांदेडमधून १९, अमरावतीमधून २, तर नागपूर विभागातून ३ असे राज्यात एकूण १४६ साखर कारखाने सुरू झाले. त्यापैकी काहींनी गाळप पूर्ण करून हंगाम आटोपला आहे. खानदेशात मुक्ताई शुगरने १ लाख ४३ हजार ५९२ मेट्रिक टनाचे गाळप करून १ लाख ५३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर सातपुडा तापी साखर कारखान्याने २ लाख ८१ हजार ५२ टनाचे गाळप करून २ लाख ९० हजार ४९० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. नवापूर येथील आदिवासी साखर कारखान्याने १ लाख १७ हजार ६९६ टनाचे गाळप केले असून, १ लाख १४ हजार ७७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आणि साखर उतारा ९.७५ इतका राहिला आहे. आस्टोरीया (आयन मल्टिट्रेंड) साखर कारखान्याचे ३ लाख ३७ हजार ८४५ मेट्रिक टनाचे गाळप करून ३ लाख ५० हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. खानदेशात ८ लाख ८० हजार १८५ टनाचे गाळप करून ९ लाख नऊ हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 

राज्यातील विभागवार गाळप, उत्पादन 

विभाग गाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख क्विंटल) साखर उतारा (टक्के) 
- कोल्हापूर ः १६१.४६ १९५.४१ १२.१०. 
- पुणे ः १२२.६७ १३६.२८ ११.११. 
- सोलापूर ः ६५.४५ , ६५.५६, १०.०२ 
- नगर ः ५३.७१ , ५५.१३, १०.२६ 
- औरंगाबाद ः ३४.०९ ३३.५३, ९.८३ 
- नांदेड ः २५.६६ २७.२७ १०.६३ 
अमरावती ३.९३ ३.९९ १०.१६ 
- नागपूर ः ३.५५ ३.४२ ९.६३ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com