अमेरिकेने नियम मोडले, तुम्ही घरातच राहा! परदेशस्थित डॉक्टरांचा सल्ला 

रमेश पटेल
Sunday, 5 April 2020

अमेरिकेसह अनेक देशातील नागरिकांनी सुरवातीला लक्ष दिले नाही, त्यामुळे आता स्थिती गंभीर होत चालली आहे, आपल्याकडेही तसे होऊ नये यासाठी घरातच राहा असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सारंगखेडा : जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक डॉक्टर देशासह विदेशात असून ते सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करीत आहेत. या डॉक्टरांनी होम क्वारंटाईन राहा आणि धैर्य बाळगा असा संदेश देत जिल्हावासियांचे मनोबल वाढविले आहे. अमेरिकेसह अनेक देशातील नागरिकांनी सुरवातीला लक्ष दिले नाही, त्यामुळे आता स्थिती गंभीर होत चालली आहे, आपल्याकडेही तसे होऊ नये यासाठी घरातच राहा असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक डॉक्टर परदेशात स्थायिक झाले आहेत. यात शहादा तालुक्यातील पन्नासवर डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनापुढे अमेरीका,चीन, इटली, फ्रान्स अशा वैज्ञानिक देशांनी गुडघे टेकले आहेत. कोरोनाशी लढताना जगभरातील संशोधकही हतबल झाले आहेत. जिल्ह्यातील गुजर समाजातील अनेक अमेरिका, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, रशिया अशा देशामध्ये आरोग्यसेवा देत आहेत. स्वतःची काळजी घेत कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करीत आहेत. 
देशात केरळ, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, बडोदा, सुरत, अंकलेश्वर, भरूच (गुजरात) या राज्यातील तसेच पुणे, मुंबई, नाशिक, नगर, धुळे आदी ठिकाणी डॉक्टर आहेत. न्यूयार्क (अमेरीका) येथे डॉ. सुरेश श्रीपत पाटील (एम.एस), युटीला (अमेरीका) येथे डॉ. अरुण पाटील, डॉ. मंगला पाटील, डॉ. कांतीलाल पाटील, डॉ. विवेक पाटील, डॉ. अॅमी पाटील, डॉ. अजय पाटील, डॉ. गोपाळ पाटील ( युमॉक्स मध्ये मेमोरियल सेंटर बी स्टज, फॉर्मसी मॅनेजर ) आहेत. प्रतीभा पाटील या अमेरीकेतील बोस्टालमध्ये प्रायमरी केअरमध्ये नर्स आहेत. लंडनमध्ये डॉ. महेश चौधरी (एम.डी) आहेत. जेम्मस ( दक्षिण आफ्रिका ) डॉ.भूषण पटेल, रशियामध्ये डॉ. कैलास चौधरी आदी डॉक्टर सेवारत आहेत. ते पुसनद, मनरद, लांबोळा, पाडळदा, लोणखेडा ( ता. नंदूरबार) शहादा, बामखेडा, मोहिदा, सातुर्खे, वरुळ कानडी येथील रहिवासी आहेत. 
 
काय म्हणतात डॉक्टर 
कोरोना बांधितांची संख्या अमेरिकेतत खूप वाढली आहे. या देशात आरोग्य यंत्रणा प्रभावी आणि रक्तनमुने तत्काळ घेतले गेले तरीही संख्या वाढली. जनता एकमेकांच्या संपर्कात खूप आली. त्यामुळे अद्यापही नियंत्रणात नाही. भारतात तत्काळ लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. तरीही जिल्हयावासियांनी होमक्वारंटाईनच राहावे. 
- डॉ. सुरेश पाटील, न्यूयॉर्क (अमेरीका, मूळ मनरद, ता. शहादा) 
 
भारताचा तुलनेत अन्य देशात खूप तपासणी सेंटर्स आहेत. मात्र तपासणी होऊनही कोरोना लागण होऊन मृत्युचे प्रमाण वाढतच आहे. काही काळ या विषाणूबाबत गाफील राहिले म्हणून संख्या वाढली, त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने स्वतःवर बंधने घालावीत. घरातच राहावे. 
- प्रतिभा पाटील, (प्रायमरी केऊर नर्स, बोस्टाल, मूळ गाव शहादा) 
 
केरळमध्ये सध्या आमच्या हॉस्पीटलमध्ये वीस कोरोना बांधित आहेत. महाराष्ट्रात संख्या वाढत आहे. नंदुरबार जिल्हयात एकही रुग्ण नसल्याचा आनंद आहे. तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात बंदिस्त राहा, या शिवाय पर्याय नाही . 
- दीपक पाटील, जोहान्स हॉस्पीटल, कट्टपन्ना(केरळ) मूळ लोणखेडा(ता.शहादा)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus america ruls not follow nandurbar district docter america setal