esakal | संसर्गाला रोखण्यासाठी जळगावरांचा "जनता कर्फ्यू' 
sakal

बोलून बातमी शोधा

janta karfu

"जनता कर्फ्यु'च्या पार्श्‍वभुमीवर शहरातील सर्वच रस्त्यांवर शांतता पाहण्यास मिळाली. शहरातून किंवा शहरात येणाऱ्या वाहनांची चाके देखील थांबलेली होती. मात्र रस्त्यावरून फिरणाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून विचारणा करत जनता कर्फ्यू पाडण्याचे आवाहन केले जात होते.

संसर्गाला रोखण्यासाठी जळगावरांचा "जनता कर्फ्यू' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून, आजचा (ता. 22) "जनता कर्फ्यू' हा या संसर्गाला रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय ठरू शकतो. या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावतरांनी घराबाहेर निघणे टाळले आहे. यामुळे सकाळा मॉर्निंग वॉक किंवा काही कामानिमित्ताने निघणाऱ्या नागरीकांमुळे गर्दीने भरणारे रस्त्यांवर शांतता होती. 

नक्‍की वाचा - जिल्हा उद्यापासून "लॉक डाउन'...काय असेल बंद व काय असेल सुरू पहा


"जनता कर्फ्यु'च्या पार्श्‍वभुमीवर शहरातील सर्वच रस्त्यांवर शांतता पाहण्यास मिळाली. शहरातून किंवा शहरात येणाऱ्या वाहनांची चाके देखील थांबलेली होती. मात्र रस्त्यावरून फिरणाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून विचारणा करत जनता कर्फ्यू पाडण्याचे आवाहन केले जात होते. परिवहन महामंडळाच्या अनेक भागांतील बससेवा बंद होती. मात्र आपत्कालीन सेवा सुरू असल्याचे पाहण्यास मिळाले. देशातील जनतेने ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एकी दाखवत घरातच थांबणे पसंत केले. 

चौक, महामार्ग सुनेसुने 
जनता कर्फ्यू असल्याने पहाटेपासूनच कोणी बाहेर निघत नसल्याचे पाहण्यास मिळाले. अन्यर्था पहाटेची वेळ असल्याने शुद्ध हवेत फिरणाऱ्यांनी रस्ते भरलेले असतात. आज हे चित्र पाहण्यास मिळाले नाही. विशेष म्हणजे शहरातील कॉलन्यांमधील रस्त्यांवर देखील शुकशुकाट होता. नेहमीची असलेली वरदळ पाहण्यास मिळाली नाही. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख चौकांमध्ये देखील कर्फ्यू असल्याचे स्पष्ट पाहण्यास मिळाले. तर शहरातून गेलेल्या महामार्गावर देखील सकाळी गाड्यांच्या चाकांचा येणारा आवाज ऐकू आला नाही. महामार्गावर देखील वाहतूक देखील पुर्णपणे बंद झालेली होती. खुप वेळानंतर एखादे वाहन जाताना दिसत होते. 

उद्यापासून लॉक डाऊन 
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉक डाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 23 मार्चपासून सोने- चांदीची दुकाने, खेळण्याची दुकाने, हॉटेल्स, ढाबे, इलेक्‍ट्रॉनिक दुकाने, फोटो स्टुडिओ, खाद्यपदार्थांच्या गाड्या, आईस्क्रीम पार्लर, ब्यूटिपार्लर, सलूनची दुकाने, वॉटर पार्क, खेळाची ठिकाणे, फटाका दुकानांसह इतर दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी ढाकणे यांनी दिले आहेत. यातून जीवनावश्‍यक सेवा मात्र वगळल्या आहेत. 

loading image