esakal | जिल्हा उद्यापासून "लॉक डाउन'...काय असेल बंद व काय असेल सुरू पहा 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना व्हायरला आटोक्‍यात आणता येईल. जिल्हा प्रशासनाकडून देखील आदेश काढून कोरोना पळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

जिल्हा उद्यापासून "लॉक डाउन'...काय असेल बंद व काय असेल सुरू पहा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवार (ता. 23) पासून जिल्हा "लॉक डाउन'चे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले. जीवनावश्‍यक वस्तू व सेवा, भाजीपाला, औषध विक्री यांना लागू राहणार नसल्याचे यात सष्ट केले आहे. 

क्‍लिक करा - पानटपऱ्या, खाद्यपदार्थ विक्री दुकाने आजपासून "बंद'

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून त्यानुसार उपाययोजना करण्याचे पाऊल देखील प्रशासनाकडून उचलण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कोरोना व्हायरला आटोक्‍यात आणता येईल. जिल्हा प्रशासनाकडून देखील आदेश काढून कोरोना पळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल, हॉटेल, ढाबे बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर आता सोमवारपासून जिल्हा लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश काढले आहेत. 

हे राहणार बंद आणि सूरू 
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 23 मार्चपासून सोने- चांदीची दुकाने, खेळण्याची दुकाने, हॉटेल्स, ढाबे, इलेक्‍ट्रॉनिक दुकाने, फोटो स्टुडिओ, खाद्यपदार्थांच्या गाड्या, आईस्क्रीम पार्लर, ब्यूटिपार्लर, सलूनची दुकाने, वॉटर पार्क, खेळाची ठिकाणे, फटाका दुकानांसह इतर दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी ढाकणे यांनी दिले आहेत. यातून जीवनावश्‍यक सेवा मात्र वगळल्या आहेत.