esakal | पोलीस असल्याचे भासवत लोकांकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यास ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

पोलीस असल्याचे भासवत लोकांकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यास ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येवला : तुमच्या नावाचे वारंट आहे तुम्ही कोर्टात हजर न झाल्यास तुम्हाला अटक होईल वारंट रद्द करायचे असल्यास काही लोकांकडून तीन हजार तर काही कडून दोन हजार अशी रक्कम उकळून मौज मजा करायची असा नवीन गोरख धंदा सुरु करणाऱ्या महा ठकास येवला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
शहराजवळील बदापूर येथील संशयित विवेक देवढे (वय २४) हा येवला न्यायालय पोलीस स्टेशन तहसील आदी महत्वाच्या ठिकाणी आपल्या ओळखिचा फायदा घेत तोतयेगिरी करायचा तसेच येवला न्यायालयाच्या आवारातून त्याने परिसरातील काही काही व्यक्तीच्या नवे आलेल्या वारंट चे आपल्या मोबाईल मध्ये गुप्त पद्धतीने  फोटो कडून परस्पर ज्यांच्या नावे  वारंट आहे त्यांना संपर्क करून पैस्यांची  मागणी करायचा या पद्धतीने त्याने अनेकांना गंडा घातला मात्र दि १ सप्टें रोजी येवला शहरातील फिर्यादी सोमनाथ कचरू शिंदे यांच्या विरोधात येवला कोर्टात एक समन्स निघाले

   हे समन्स चा फोटो संशयित आरोपी   विवेक देवढे याच्या हाती लागले  त्या नुसार त्याने सोमनाथ शिंदे याना नेहमीच्या पद्धतीने संपर्क करत तुझे वारंट निघाले असून ते रद्द करण्यासाठी २००० रु ची मागणी केली मात्र  फिर्यादी सोमनाथ शिंदे यांस त्याचा संशय आल्याने  त्याने त्वरित येवला शहर पोलिसांशी संपर्क केला  त्या मुळे या तोतया पोलीस  म्हणून मिरवणाऱ्या संशयीत आरोपी चे पितळ उघडे झाले  पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक एम जे मोरे करीत आहेत.

   तोतया पोलीस  म्हणून मिरवणाऱ्या संशयीत आरोपीने खऱ्या पोलिसाना अरेरेरावी केली. पोलीस ठाण्यात आणले असता "माझ्यावर कोण गुन्हा दाखल करतो ते पाहतो माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत माझं कोणी काहीही करू शकत नाही असे बोलून याने पोलिसाना एक प्रकारचे आव्हान दिले होते.पोलिसांनी कारवाई केलीच. या तोतया पोलीसाने स्वतःच्या गावातील लोकांकडून देखील मी पोलीस आहे तहसील मध्ये माझी ओळख आहे असे सांगून गोर गरिबांना लुबाडल्याचे सांगितले जाते.

loading image
go to top