नाशिकच्या जवानांची सायकल मोहीम नागपुरात दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नाशिक : "वाहतूक सुरक्षितता आणि आरोग्या'चा संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आणि हवाई दलाच्या जवानांची सायकल मोहीम पाच दिवसांच्या प्रवासानंतर नागपूरात दाखल झाली. 
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन, पोलीस अधिक्षक शैलेश बालवडकर, हवाईदलाचे एअर व्हाईस मार्शल मानवेंद्र सिंग यांनी जवानांचे स्वागत केले. प्रवासादरम्यान, जवानांनी शाळा-महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षितता आणि हवाईदलातील संधी याविषयी मार्गदर्शन करीत नागपूर गाठले. 12 जणांचा चमू उद्या (ता.28) सकाळी नाशिकला परतीच्या वाटेवर निघणार आहे. 

 नाशिक पोलीस आयुक्तालयातून गेल्या गुरुवारी (ता.22) सकाळी सहा पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि हवाईदलाचे सहा जवान सायकलीवरून नागपूरच्या दिशेने निघाले होते. पाच दिवसांमध्ये या 12 जवानांच्या चमूने 780 कि.मी. अंतर सायकलने कापत नागपूर गाठले. वाटेमध्ये चांदवड येथील नेमीनाथ जैन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षिततेचा संदेश दिला तसेच, वायुदलातील संधीविषयी मार्गदर्शन केले. धुळ्यात पहिला मुक्काम केल्यानंतर पहाटे धुळ्याचे पोलीस अधीक्षक रामकुमार यांनीही 25 कि.मी.अंतरापर्यंत जवानासंगे सायकल रॅली केली. भुसावळमार्गे शेगावात मुक्काम केला असता, त्यावेळी तेथे जमलेल्या भाविकांनाही मार्गदर्शन केले. पुढे अमरावतीमध्ये गेल्यानंतर तेथील एसआरपीएफला भेट देऊन तेथील जवानांनाही मार्गदर्शन केले. अकोल्यात मुक्काम केल्यानंतर जवानांनी सोमवारी (ता.26) सायंकाळी नागपूर गाठले. 

जवानांनी नागपूरातील वायुदलाच्या मुख्यालयास भेट दिली असता, हवाईदलाचे एअर व्हाईल मार्शल मानवेंद्र सिंग यांनी स्वागत केले. त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन्‌, पोलीस अधीक्षक शैलेश बालवडकर यांनीही जवानांचे स्वागत करीत कौतूक केले. हा चमू उद्या (ता.28) सकाळी सहाला यवतमाळच्या दिशेने नाशिककडे परतीच्या मार्गावर मार्गस्थ होणार आहेत. या संघात नाशिक पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार नंदू उगले, बाळकृष्ण वेताळ, सुदाम सांगळे, दिनेश माळी, किरण वडजे, हर्षल बोरसे, एम.के. धुम, फुलचंद पवार तर वायु दलाचे स्कॉड्रन लिडर संतोष दुबे, फ्लाईंग लेफ्टनंट सुमीत, ज्युनिअर वॉरंट अधिकारी नितीन पाटील, सार्जंट संजय, कॉर्पोरल समीउल्ला, एस.ए. जाधव, रवींदर, धीरज, सुमीत, मनजीत यांचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cycle rally in nagpur