esakal | जन्मता ती होती दिव्यांग, आता संगणकावर गिरवणार ज्ञानाचे धडे 
sakal

बोलून बातमी शोधा

जन्मता ती होती दिव्यांग, आता संगणकावर गिरवणार ज्ञानाचे धडे 

तीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी समाजकल्याण विभागाने लॅपटॉप घेणेसाठी पंधरा हजाराचा धनादेश दिला आहे. दीपालीला चांगल्या कंपनीचा लॅपटॉप घेणेसाठी अधिकची आर्थिक मदतीची गरज होती.

जन्मता ती होती दिव्यांग, आता संगणकावर गिरवणार ज्ञानाचे धडे 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : येथील इंदिरा नगरातील शेतमजूर कुटूंबातील दीपाली संजय माळी जन्मतःच दिव्यांग होती. डॉ.राधेश्याम रोडा यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला बऱ्यापैकी दिसू लागले. आता मुंबईतील रुईया महाविद्यालयात शिकणाऱ्या दीपालीला संगणकाची आवड आहे. तिला समाजकल्याण विभागाने पंधरा हजार व जिल्हा परीषद सदस्यांनी आठ हजाराची मदत केली आहे. दीपाली आता संगणकावरच ज्ञानदीप तेजस्वी करणार आहे. अभ्यासाचे धडे गिरवणार आहे. 

दीपाली माळी बालपणापासूनच जिद्दी, महत्वाकांक्षी आहे. डोळस जगात यशस्वी होण्यासाठी ती हिंमतीने लढत आहे. धुळे शहरातील अंध मुलींच्या वसतिगृहात राहून जिजामाता कन्या विद्यालयातून बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. आता मुंबई येथे समाजकल्याणच्या शासकीय वसतिगृहात राहून रुईया महाविद्यालयात कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. तिला संगणकाची अधिक आवड आहे. तीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी समाजकल्याण विभागाने लॅपटॉप घेणेसाठी पंधरा हजाराचा धनादेश दिला आहे. दीपालीला चांगल्या कंपनीचा लॅपटॉप घेणेसाठी अधिकची आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी कृषी सभापती बापू खलाणे यांनी जिल्हा परीषद सदस्य प्रा.अरविंद जाधव, आशुतोष पाटील, विजय गांगुर्डे आदींकडून आठ हजार संकलित करून दिले. 

पदवीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून सरकारी नोकरी मिळवायची आहे. स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे. आईवडिलांनाही उभारी द्यायची आहे. 
-दीपाली माळी, कापडणे  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image