esakal | आशापुरी देवस्थान समितीने फुलविली फुलशेती 
sakal

बोलून बातमी शोधा

rose farm

फुलांचे उत्पादन सुरू झाल्याने त्यांना शिरपूर येथील बाजारात मोठी मागणी आहे. देवीचे फूल प्रसाद म्हणून घेण्यासाठी वाढीव भावही मिळत आहे. विवाहासाठी आवश्‍यक पुष्पहारांसाठीही या फुलांचा वापर होत आहे. या वर्षी स्थानिक बाजारातच ही फुले उपलब्ध झाल्याने फूल विक्रेत्यांचीही सोय झाली आहे.

आशापुरी देवस्थान समितीने फुलविली फुलशेती 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : पाटण (ता. शिंदखेडा) येथील कुलदैवत आशापुरी देवी मंदिर देवस्थान समितीने मंदिर परिसरातील तीन एकर क्षेत्रात बिजली फुलांची शेती फुलविली आहे. देवीच्या दर्शनासह ऐन उन्हाळ्यात फुललेली फुलशेती पाहण्यासाठी भाविकांची मांदियाळी वाढली आहे. विशेष म्हणजे शिरपूरच्या बाजारात या फुलांना मोठी मागणी आहे. या माध्यमातून देवस्थान समितीला उत्पन्नाचा नवीन स्त्रोतही उपबल्ध झाला आहे. 

मंदिर परिसराचे खुलले सौंदर्य 
पाटण येथील आशापुरी देवी मंदिर देवस्थानचा विस्तीर्ण परिसर आहे. समितीतर्फे मंदिर परिसरात निसर्गरम्य उद्यानाचे कामही सुरू आहे. यासाठी समितीने परिसराचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. तीन एकर क्षेत्रात बिजली फुलांची शेती फुलविली आहे. यासाठी जळगाव येथून रोपे आणली होती. आता फुलांचे उत्पादन सुरू झाल्याने त्यांना शिरपूर येथील बाजारात मोठी मागणी आहे. देवीचे फूल प्रसाद म्हणून घेण्यासाठी वाढीव भावही मिळत आहे. विवाहासाठी आवश्‍यक पुष्पहारांसाठीही या फुलांचा वापर होत आहे. या वर्षी स्थानिक बाजारातच ही फुले उपलब्ध झाल्याने फूल विक्रेत्यांचीही सोय झाली आहे. 

मंदिर ट्रस्टला मोठा आधार 
अशी फुलशेती फुलविणारे आशापुरी देवी मंदिर संस्थान परिसरातील पहिलेच देवस्थान आहे. सुगंधी आणि चित्तवेधक रंगसंगतीच्या फुलशेतीने सगळ्यांच्याच नजरा वेधून घेतल्या आहेत. या फुलशेतीतून देवस्थान समितीला यंदा लाखाहून अधिक उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून फुलशेतीचीही पाहणी केली जात आहे. बहुतांक भाविक फुलशेतीत "सेल्फी'चा आनंद घेत आहेत. 

उद्यानाच्या कामाला वेग 
मंदिर समितीने गेल्या नवरात्रीत झेंडू फुलांचे उत्पादन घेतले होते. सध्या येथे उद्यानाचे काम वेगात सुरू आहे. बालकांसाठी मिनी वॉटर पार्कही उभारला जात आहे. मल्टीपर्पज हॉलचे काम पूर्णत्वास आले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष मन्साराम माळी, सचिव चैनसिंह राऊळ, विश्वस्त श्री. कोळी, प्रा. विशाल पवार, अधिकार परदेशी, गणेश जोशी, जगदीश मराठे आदी सेवक ही शेती फुलविण्यासाठी मेहनत घेत आहेत.