esakal | मित्राच्या हळद कार्यक्रमाला निघाला मित्रांना, कुटूंबाला चटका लावून गेला 
sakal

बोलून बातमी शोधा

मित्राच्या हळद कार्यक्रमाला निघाला मित्रांना, कुटूंबाला चटका लावून गेला 

मित्राच्या हळदिच्या कार्यक्रमास जात असतांना बैलगाडीच्या मागच्या बाजुला धक्का लागल्याने यकृताला जबर मार लागल्याने मृत्यु झाला.

मित्राच्या हळद कार्यक्रमाला निघाला मित्रांना, कुटूंबाला चटका लावून गेला 

sakal_logo
By
विनोद शिंदे

 कुसुंबा(ता.धुळे) : अक्कलकुवा येथून पिंपळनेर येथे मित्राच्या हळद समारंभास जात असतांना संजित कांतीलाल ठाकरे (वय28)या युवकाचे दि.5 डिसेंबर रोजी निझर (गुजरात सिमा) येथे अपघाती निधन झाले, संजित ठाकरे मुळ कोळदे (ता.नवापुर) येथिल रहिवासी असुन अक्कलकुवा पंचायत समीतीचे सेवानिवृत्त कर्मचारी कांतीलाल ठाकरे यांचे चिरजींव होत.

वाचा- शिवसेनेचे अनोखे आंदोलन; साचलेल्या पाण्यात कागदी बोटी सोडून सत्ताधारी भाजपचा निषेध

अक्कलकुव्याहुन पल्सर या मोटार सायकलीने सायंकाळी पिंपळनेर येथे मित्राच्या हळदिच्या कार्यक्रमास जात असतांना बैलगाडीच्या मागच्या बाजुला धक्का लागल्याने यकृताला जबर मार लागल्याने मृत्यु झाला,या प्रसंगी जवाहर नवोदय विद्यालयाचे मित्र तसेच अक्कलकुवा येथिल मित्रांनी अपघात स्थळी सहकार्य केले. ,निझर येथिल शासकिय रूग्णालयातील डॉक्टरांनी संजितला मृत घोषीत केले.

अधिकारी होण्याचे स्वप्न अधूरे

संजितचे पदवी (बी.ए.) शिक्षण झाले असल्याने एमपीएससीचा अभ्यास नासिक येथे सुरू होता,मात्र लॉकडाऊन असल्याने तो अक्कलकुवा येथे आला होता, घरीच ऑनलाईन अभ्यास सुरू होता, राज्यसेवाद्वारे अधिकारी होऊन सामान्य व आदिवासीं साठी सेवा करण्याची संजितची ईच्छा मात्र अपूर्णच राहिली भविष्यात एनजीओ सुरू करण्याचा मानस त्याने मित्रांना बोलून दाखविला होता.

घरातील हुरहुन्नरी,हुशार व कर्ता मुलगा काळाने हिरावल्याने ठाकरे परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.संजित योगसन मध्ये राष्ट्रीय स्तरावर जाऊन आला होता तसेच हॅण्डबॉल,बास्केटबॉल पुणे विभाग संघाचे नेतृत्व केले होते. ड्रम वाजविण्यात प्राविण्य असलेल्या संजित आमच्या सदैवं स्मरणात राहिल अशा प्रतिक्रिया मित्र परीवाराने व्यक्त केल्या. 

loading image