अमरिशभाई पटेलांनी विधानपरिषेदेचा भरला अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधानपरिषदेचा आज माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी आमदार पावरा, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या आज भरला

धुळे ः धुळे व नंदूरबार विधान परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी आज दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तीप्रदर्शन करीत अर्ज भरला. यावेळी भाजपचे आमदार काशिराम पावरा, माजी मंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते. 

भाजपतर्फे दोन दिवसापूर्वीच अमरिशभाई पटेल यांची धुळे व नंदूरबार विधानपरीषद मतदार संघासाठी उभे राहण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधानपरिषदेचा आज माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी आमदार पावरा, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या आज भरला. यावेळी विलेपार्ले केळवणी मंडळाच्या कॅंपसमध्ये मोठ्या प्रमाणात सकाळी मोठ्या प्रमाणात भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. तसेच माध्यमांशी बोलताना अमरिशभाई म्हणाले, की आमचाच विजयी निश्‍चित होईल असे असे विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

बिनविरोध निवड होण्यासाठी प्रयत्न 
विधानपरिषद निवडणूक ही आम्हाला बिनविरोध करायची आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून भाजपकडे बिनविरोध करण्यासाठी संख्याबळ आहे. त्यामुळे अमरिशभाई हे बिनविरोध निवडणूक येतील याचा आम्हाला पूर्ण विश्‍वास आहे असे माजी मंत्री रावल यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Amarishbhai Patel filed application form for Legislative Assembly