esakal | धुळ्यात 24 जणांवर, नाशिकला दोघांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

patient

रूग्णालयात अतिदक्षता विभागही कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात "कोरोना'चे आतापर्यंत 32 रुग्ण आढळले. पैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

धुळ्यात 24 जणांवर, नाशिकला दोघांवर उपचार

sakal_logo
By
बी. एम. पाटील

धुळे : "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात "कोविड 19' कक्ष कार्यान्वित आहे. त्यात रुग्णालयातील दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात, तर उर्वरित 22 रुग्णांवर "कोविड केअर सेंटर'मधील सर्वसाधारण वॉर्डात उपचार सुरू आहेत.

रूग्णालयात अतिदक्षता विभागही कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात "कोरोना'चे आतापर्यंत 32 रुग्ण आढळले. पैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी यापुढेही काळजी घ्यावी, नागरिकांनीही सहकार्य करावे, "लॉक डाउन'च्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे यांनी केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक पंडित, महापालिका आयुक्त शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात आरोग्य विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे.

248 जणांचे स्कॅनिंग
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात 248 जणांचे थर्मल स्कॅनिंग झाले. 38 जणांना दाखल करून घेण्यात आले. 13 जणांची तपासणी झाली असून 14 अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील सर्वोपचार रुग्णालयात थर्मल स्कॅनिंगसाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या धुळे शहरातील आहे. त्यामुळे तपासणीसाठीही शहरातील अनेक जण येत आहेत. तपासणीनंतर 38 जणांना दाखल करून घेण्यात आले आहे. यात 13 जणांच्या शरीरातील नमुने घेण्यात आले. 14 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आजअखेर 6 हजार 308 जणांचे थर्मल स्कॅनिंग झाले. 928 जणांची नमुने तपासणी झाली. त्यातील 882 अहवाल निगेटिव्ह तर 32 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. सध्या 2 हजार 406 जण होम क्वांरटाइन आहेत. अधिष्ठाता डॉ. एन.एन. रामराजे, सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी आढावा घेतला.

loading image