esakal | रोकड नाही चक्‍क कांदा चोरीसाठी नाशिकहून आले धुळे परिसरात
sakal

बोलून बातमी शोधा

onion thief

मध्‍यरात्रीनंतर साधारण दोन वाजेच्या सुमारास शेतकरी योगेश घरटे हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना किरण घरटे यांच्या कांद्याच्या शेडजवळ एक पिकअप गाडी उभी असलेली दिसली.

रोकड नाही चक्‍क कांदा चोरीसाठी नाशिकहून आले धुळे परिसरात

sakal_logo
By
चंद्रकांत घरटे

सामोडे (धुळे) : कांद्याचे भाव गगणाला भिडताच चोरांनी आपला मोर्चा शेताकडे वळवला. रात्रीतून कांदा चाळीतून कांदा चोरण्याचा उपक्रम सुरु केला. आज पहाटे तीन– चार वाजेच्या सुमारास सामोडे येथील शेतकरीच्या कांदा चाळीतील कांदा चोरताना तीन चोरटे व पिकप गाडी शेतकऱ्यांच्‍या जागृतीमुळे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. गाडी सह कांदा व साहित्य तीन लाख ४ हजार ५०० रूपयाचा मुद्देमालासह तीन चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले

सामोडे येथील शेतकरी किरण सिताराम घरटे यांच्या सामोडे शिवारातील शेताजवळ कांद्याची चाळ असून त्यात कांदे भरलेले आहेत. आज मध्‍यरात्रीनंतर साधारण दोन वाजेच्या सुमारास शेतकरी योगेश घरटे हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना किरण घरटे यांच्या कांद्याच्या शेडजवळ एक पिकअप गाडी उभी असलेली दिसली. जवळ जाऊन पाहिला असता तिथे तीन- चार व्यक्ती कांदे भरताना दिसून आले. त्‍यांना पाहता क्षणी गाडी चालू करून ते म्हसदी गावाकडे निघून गेले. योगेश घरटे यांनी खरे मालक किरण घरटे यांना फोन करून बोलावले. 

गावात उभी सापडली गाडी
चार- पाच व्यक्ती मिळून म्हसदी गावाकडे जाऊन सदर गाडी पिकअप (एमएच १२, एयू ६८०७) गावात उभी असलेली दिसली. त्यात चार व्यक्ती होते. शेतकऱ्यांना पहाताच त्‍यातील एक जण फरार झाला. तर बाकी तीन व्यक्ती शेतकऱ्यांच्या ताब्यात सापडले. त्यांची चौकशी केली असता गाडीत शेडमधील कांदा आढळून आला. सदर आरोपींना गाडीसह पिंपळनेर पोलिस स्टेशनला आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथे त्यांनी आपली नावे मनोज रघुनाथ भागवत (गोंदे दुमाला, ता. इगतपुरी), संदीप बाजीराव सोनवणे (रा. ब्राह्मणगाव, ता. सटाणा) आणि किरण बाजीराव सोनवणे (रा. ब्राह्मणगाव, ता. सटाणा) तर पसार झालेला संजय चैत्राम गावित (रा. गुंजाळ ता. साक्री) असे त्याचे नाव कळाले. आरोपीच्या विरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेतकरी पुसणार घाम अन्‌ चोर लखपती 
गुन्ह्यात वापरलेली पिकप गाडी 3 लाख रु., पन्नास किलो कांदे अंदाजे किंमत चार हजार पाचशे रुपये, प्लास्टिकच्या टोपल्या किंमत तीनशे रुपये असे एकुण 3 लाख 4 हजार 800 रुपये किंमतीचे वस्तू पोलिसांच्या ताब्यात मिळाल्या आहेत. सदर आरोपींना साक्री न्यायालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मनोज शिरसाट करत आहेत. या आधी आठ दीवसांपुर्वी माजी जि.प. सदस्य अँड. ज्ञानेश्वर एखंडे यांचाही २५ क्वीटल कांदे चाळीतून चोरीस गेले होते. आता शेतकऱ्यांनी लाख मोलाचा कांदा शिवार मिळून सांभाळावा लागेल नाहीतर चोर रात्रीतून लखपती बनतील आणि शेतकरि कर्जबाजारी होतील. 

संपादन ः राजेश सोनवणे