esakal | दागिनी पाॅलिश करण्यासाठी दिले नाही म्हणून महिलेवर ऍसिड हल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

दागिनी पाॅलिश करण्यासाठी दिले नाही म्हणून महिलेवर ऍसिड हल्ला 

ओट्यावर बसलेली असताना संशयिताने तेथे जाऊन महिलेस तिचे चांदीचे दागिने उजळून देतो असे सांगितले. परंतु संबंधितास महिला ओळखत नसल्याने नकार दिला.

दागिनी पाॅलिश करण्यासाठी दिले नाही म्हणून महिलेवर ऍसिड हल्ला 

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर : राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असून महिला व मुलींवरील अत्यांचार व त्यांचे खून करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वआढत आहे. त्यात गुरूवारी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रायपुर गावातील एका महिलेवर चांदीचे दागीने पाॅलिश करण्यासाठी न दिल्याने त्या महिलेच्या अंगावर ऍसिड फेकून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी आज पिडीतीचे फिर्यादीवरून निजापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

फिर्यादी महिला गुरुवारी (ता.२२) सकाळपासून त्यांच्या गावालगतच्या शेतात कापूस वेचणाऱ्या मजुरांवर देखरेखीसाठी कुटुंबीयांसह गेलेली होती. महिला दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या शेताजवळच्या महादेव मंदिराच्या ओट्यावर बसलेली असताना संशयिताने तेथे जाऊन महिलेस तिचे चांदीचे दागिने उजळून देतो असे सांगितले. परंतु संबंधितास महिला ओळखत नसल्याने नकार देत तिने त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले.

आणि काढले बाटलीतून ऍसिड

महिलेने जाण्यास सांगिल्याचा राग आल्याने संशयिताने त्याच्याजवळ असलेल्या एका बाटलीतून ऍसिडसदृश काहीतरी रासायनिक द्रव महिलेच्या अंगावर फेकला. त्यामुळे त्या महिलेच्या छातीवर, पोटावर व हातांवर जखमा झाल्या व भाजली गेल्याने पीडित महिला जोरजोराने ओरडू लागली. तेवढ्यात शेतात काम करीत असलेला महिलेचा पती दगडू तुळशीराम कोरडकर, नातेवाईक योगेश कोरडकर, सुरेश कोरडकर व सालदार आप्पा भिल यांनी धावून आले.

संशयीताला पकडून ठेवले

पती व शेतात काम करणारे नातेवाई व सालदार पळत येऊन अनोळखी इसमास पकडले व जखमी महिलेस आरोपीसह तेथे उभ्या असलेल्या खाजगी वाहनाने तत्काळ निजामपूर पोलिस ठाण्यात आणले. तेथून मेडिकल मेमो घेऊन महिलेस जैताणे आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून प्रथमोपचार घेऊन महिलेस साक्री येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सुनंदाबाई कोरडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मिथुनकुमारविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे