autism day : धुळ्यात "ऑटिझम सेंटर' पालकांसाठी आधारवड 

autism day
autism day

देऊर : ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, स्वतःच्या विश्वात रममाण असणारी मुले. मेंदूत घडलेल्या काही न्युरोलॉजिकल हालचालीमुळे "ऑटिझम' अवस्था घेऊन अनेक मुले जन्माला येतात. पुणे, नाशिक, मुंबईपाठोपाठ धुळे शहरात गेल्या चार वर्षांपासून विशेष मुलांचे शिक्षण घेतलेल्या पूनम पाटील "स्वप्न थेरपी ऍण्ड लर्निंग सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रेन' सेंटरच्या माध्यमातून मुलांना घडवत आहे. जिल्ह्यातील पहिलेच ऑटिझम सेंटर पालकांसाठी आधारवड ठरले आहे. स्वमग्न मुलांचा विकास आणि स्वावलंबनासाठी या केंद्रातून मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्रीमती पाटील प्रयत्नशील आहेत. प्रशिक्षित पूनम पाटील विशेष मुलांना कसे शिकवायचे याचे एमए,बीएडचे शिक्षण, समुपदेशक व स्वमग्न मुलांच्या उपचार पद्धती हैदराबाद, बंगळूर, मुंबई येथे आत्मसात केले. सेंटरमध्ये 30 मुले आहेत. पाच हजार खेळण्याच्या सहाय्याने मुलांना त्यांच्या गरजा शिकवल्या जातात. दरमहा काही थेरपिस्ट मार्गदर्शन करतात. सेंटर मधल्या 30 मुलांमधून 20 मुले सामान्य शाळेत जात आहेत. या मुलांच्या पालकांसाठी प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल उपक्रम घेतले जातात. स्वमग्न मुलांच्या भाषाविकासात येणारे अडथळेच प्रगतीसाठी घातक ठरत असल्याची बाब समोर येत आहे. त्यासाठी "स्वप्न थेरपी ऍण्ड लर्निंग सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रेन' नावाची शाळा काम करीत आहेत. येथे येणाऱ्या सर्व बालकांमध्ये हळूहळू बदल होत दैनंदिन प्रवाहात येत आहे. 
 

स्वमग्नता कशी ओळखावी? 
- जन्मानंतर सहा महिन्यांत लक्षणे दिसतात 
- दोन वर्षांनंतर वैद्यकीय निदान शक्‍य 
- सतत निर्जीव वस्तूंसोबत खेळत राहणे 
- उजेड, आवाजामुळे त्रास होणे 
- स्पर्शदेखील सहन न होणे 
- वारंवार एकच कृती करीत राहणे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com