देऊर : धुळे तालुक्यातील जुने भदाने शिवारात पाण्यात बिबट्या मादी मृतावस्थेत आढळून आली. बिबट्या मादी बरोबरच तळ्यात मांजर देखील मृतावस्थेत आढळली आहे. यावरून बिबट्या मादी भक्ष्याच्या मागे लागून (मांजराच्या मागे) तळ्यात पडली असावी असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

देऊर, भदाणे, चिंचखेडे, ककाणी शेती शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा अधिवास वाढला आहे. गुरूवारी बिबट्या सावजचा (मांजर) पाठलाग उजव्या कालव्यातून करीत होता. सावजच्या पाठोपाठ कालव्यात असलेल्या तळफरशीत दोन्ही पडले. तळ्यात पडल्यानंतर या मादी बिबट्याला बाहेर येता आले नाही व त्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्यात तरगतांना सायंकाळी उशीरा ग्रामस्थांना निदर्शनास आले. घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविली असता अधिकाऱ्यांनी बिबट्या मातीचा शवविच्छेदन करून त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचनामा वेळी सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी महेश पाटील, वनपाल मुकेश सोनार, वनरक्षक अनिल पाटील, वनमजूर संजय विभांडिक उपस्थित होते.
आणखी बिबट्या असण्याची शक्यता
परिसरात बिबट्या मादी मृतावस्थेत आढळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्या मादीच्या साथीदारांचा अजूनही परिसरात वावर असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय परिसरात बिबट्यांचा त्रास वाढला आहे. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.