esakal | शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय;  छापा पडला आणि सत्य समोर आले !  
sakal

बोलून बातमी शोधा

bogas doctor

दवाखान्याची तपासणी केली असता बच्छावच्या घरी कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मिळून आला नाही. मात्र इंजेक्शन देण्याचे व इतर साहित्य मिळून आले.

शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय;  छापा पडला आणि सत्य समोर आले !  

sakal_logo
By
विजयसिंह गिरासे

चिमठाणे : धुळे येथील खासगी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करणाऱ्यानेच चक्क गावात दवाखाना थाटून रूग्णांवर उपचार सुरू केल्याचा प्रकार साळवे (ता.शिंदखेडा) येथे समोर आला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवून कारवाई केली जाणार आहे.


साळवे येथील ग्रामस्थांनी गावात बोगस डॉक्टर असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांच्याकडे केली होती. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी मोरे यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. बोगस डॉक्टर किशोर बच्छाव (रा. खोरी, ता. साक्री) यांच्याकडे कुठलीही पदवी नसताना साळवे येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून घरातच दवाखाना थाटून वैद्यकीय व्यवसाय करीत आहे.

लेखी तक्रार आली पडला छापा..

या प्रकाराबाबत साळवे येथील पोपट पाटील यांनी लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत डॉ. मोरे, पर्यवेक्षक आर.एन. सुर्वे, चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक व्ही. एम. सैंदाणे व पथकातील कर्मचारी यांनी बोगस डॉक्टर बच्छावच्या राहत्या घरात थाटलेल्या दवाखान्यात छापा टाकला.

डाॅक्टरकी व्यवसायाचे कोणतेही कागदपत्रे नाही

दवाखान्याची तपासणी केली असता बच्छावच्या घरी कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मिळून आला नाही. मात्र इंजेक्शन देण्याचे व इतर साहित्य मिळून आले. यामुळे बोगस डॉक्टरांचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे