esakal | धुळे जिल्हातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

Jaytan Villege Booth Election

धुळे जिल्हातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांतील अकरा उमेदवार व पंचायत समितीच्या पाच गणांतील दहा उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटी (Election) बंद होणार आहे. १५६ मतदान केंद्रांवर ६२६ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या अध्यक्षतेखाली मतदान यंत्रांचे (Voting machine) सोमवारी वाटप झाले. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी दोंडाईचा व शिंदखेडा पोलिस ठाण्याला निवडणूक बंदोबस्तात भेट देऊन मार्गदर्शन केले. तर आज सकाळी सर्व मतदान केंद्रावर (Polling station) मतदानाची प्रक्रिया सुरू होवून मतदानासाठी मतदारांचा रांगा दिसत होत्या.

हेही वाचा: धुळ्यात गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात..


जिल्हा परिषदेच्या खलाणे, मालपूर, नरडाणा व बेटावद गटासाठी, तर पंचायत समितीच्या हातनूर, दाऊळ, वर्शी, मेथी व खर्दे बुद्रुक गणासाठी निवडणूक आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होणार आहे. सोमवारी तहसील कार्यालयातून ३० वाहनांद्वारे १५६ बूथवर ६२६ कर्मचारी, तर १५६ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी असे एकूण ७८२ कर्मचारी रवाना झाले. मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे शेवटचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भामरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सैंदाणे व सुदाम महाजन यांनी घेतले. शिंदखेडा पोलिस ठाणे हद्दीतील निरीक्षक सुनील भाबड, दोंडाईचा पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी व नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावला आहे. बुधवारी (ता. ६) सकाळी दहाला शिंदखेडा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी होणार आहे.


शिंदखेडा, दोंडाईचा व नरडाणा पोलिस ठाण्यात अंतर्गत दोन पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, अकरा पोलिस उपनिरीक्षक, २०२ महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, ३० नाशिक ग्रामीण महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, १४९ होमगार्ड व तीन एसआरपीच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

loading image
go to top