esakal | धुळ्यात गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात..
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात..

धुळ्यात गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


धुळे : गावठी कट्टा विक्रीसाठी धुळे शहरात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminals) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने (LCB Police) सोमवारी पकडले (Arrest). त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूसही (Pistol) पथकाने जप्त केले. ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगारावर राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: Jalgaon : खडसे-महाजन वादामुळे सर्वपक्षीय पॅनल वांध्यात


मोहाडी उपनगर येथील दंडेवालाबाबानगरमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार खुशाल ऊर्फ मनोज अशोक मोकल हा गावटी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने शहरात फिरत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना रात्री मिळाली होती. त्यानुसार पथकाने शोध सुरू केला. सव्वादहाच्या सुमारास सीताराम माळी चौकीजवळील साईबाबा मंदिराशेजारी पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व मॅगझिनसह एक हजाराची जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळून आला.

हेही वाचा: पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने उसळली दंगल

अनेक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे
या प्रकरणी मनोज मोकलविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याच्याविरोधात धुळे शहरातील चाळीसगाव रोड, धुळे शहर, पश्‍चिम देवपूर, मोहाडी, मालेगाव रोड, गंगापूर (जि. नाशिक), एमआयडीसी जळगाव, मुंबई नाका (नाशिक), मालेगाव छावणी, अंबड (नाशिक) आदी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, प्रकाश सोनार, कुणाल पानपाटील, संदीप सरग, रविकिरण राजेड, उमेश पवार, विशाल पाटील, संजय सुरसे, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top