esakal | पोलिसांच्‍या कमरेत लाथ मारून पळाला अन्‌ थेट मारली विहिरीत उडी
sakal

बोलून बातमी शोधा

dhule captive police

न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींना ‘कोरोना’च्या अनुषंगाने तपासणी करून १४ दिवसांसाठी ठेवले जाते. मोहाडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी आसिफ शाह अजिज शाह (वय २३, रा. सरदार हॉटेलसमोर, शंभर फुटी रोड, धुळे) हा ७ सप्टेंबरपासून या कारागृहात होता. 

पोलिसांच्‍या कमरेत लाथ मारून पळाला अन्‌ थेट मारली विहिरीत उडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर येथील जिजामाता हायस्कूलमध्ये केलेल्या तात्पुरत्या कारागृहात असलेला एक बंदिवान पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळून गेला. जवळच असलेल्या एका तळघरातील विहिरीत नंतर त्याने उडी मारली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला बाहेर काढून पुन्हा ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संबंधित बंदिवानाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हणत गुन्हा दाखल केला आहे. 
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर येथील जिजामाता कन्या हायस्कूलमध्ये तात्पुरते कारागृह सुरू केले आहे. या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींना ‘कोरोना’च्या अनुषंगाने तपासणी करून १४ दिवसांसाठी ठेवले जाते. मोहाडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी आसिफ शाह अजिज शाह (वय २३, रा. सरदार हॉटेलसमोर, शंभर फुटी रोड, धुळे) हा ७ सप्टेंबरपासून या कारागृहात होता. 

पोलिसाशी झटापट
रविवारी दुपारी जिजामाता हायस्कूलमधील तात्पुरत्या कचराकुंडीत टाकण्यासाठी कचऱ्याची बकेट घेऊन जाताना सोबत असलेले पोलिस कर्मचारी चंद्रकांत निकुंभे यांच्या हाताला झटका देऊन व झटापटी करून कमरेवर लाथ मारून तात्पुरत्या कारागृहाच्या प्रवेशव्दारातून गरुड संकुलाच्या इमारतीच्या तळमजल्यावरील अंधारात लपून बसला. नंतर त्याने जवळच असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत स्वतःहून उड्डी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आखाडे तपास करीत आहेत. 

बाहेर काढत घेतले ताब्यात 
बंदिवान आसिफ शाह याने विहिरीत उडी मारल्यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला बाहेर काढले. ताब्यात घेताना तो विरोध करत असल्याने पोलिसांना त्याला अक्षरशः हात-पाय धरून उचलून न्यावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी या परिसरात बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.