आईला बोलला अपशब्द; बापाने मुलालाच जीवे मारले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 March 2020

डोक्‍यावर बांधकामाची लाकडी फळी मारली. यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. सुरवातीला देविदास वाघ व कुटुंबाने नवीन बांधकाम चालू असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने योगेशचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला.

धुळे : इंदवे (ता. साक्री) येथील गावातील नवीन घराचा दुसरा मजला पाहिजे, या कारणावरून मुलाने आपल्याच आईला अश्‍लील शब्द उच्चारून शिवीगाळ केली. त्याचा राग मनात ठेवून बापानेच मुलाच्या डोक्‍यात बांधकामाची लाकडी फळी मारून ठार मारल्याची घटना घडली. 

इंदवे (ता. साक्री) येथे शनिवारी (ता. 21) सकाळी अकराला योगेश देविदास वाघ (वय 40) याने नवीन घराचा दुसरा मजला पाहिजे. म्हणून आई मथुराबाईला अश्‍लील शब्द उच्चारून शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या योगेशचे वडील देविदास सीताराम वाघ यांनी योगेशच्या डोक्‍यावर बांधकामाची लाकडी फळी मारली. यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. सुरवातीला देविदास वाघ व कुटुंबाने नवीन बांधकाम चालू असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने योगेशचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. घटनास्थळी पडलेल्या रक्‍तावर शेण टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. 
या प्रकरणी पोलिसपाटील संतोष पाटील यांना वाघ कुटुंबीयांनी खोटी माहिती दिली. तसेच खरी माहिती उजेडात आल्यांनतर पोलिसपाटील संतोष पाटील यांनी निजामजूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयित देविदास वाघला अटक केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. शिरसाट तपास करीत आहेत. 

शेण टाकून पुरावे केले नष्ट 
कुटुंबीयांनी मुलाचा घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव केला. तसेच पडलेल्या रक्‍तावर शेण टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule child toking mother house second flower and father murder